Harshvardhan Sapkal Rajura visit Congress | काँग्रेसला मिळणार नवचैतन्य? हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळाली ऊर्जा

Harshvardhan Sapkal Rajura visit Congress | काँग्रेसला मिळणार नवचैतन्य? हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळाली ऊर्जा

Harshvardhan Sapkal Rajura visit Congress

Harshvardhan Sapkal Rajura visit Congress : राजुरा 28 ऑक्टोबर (News वृत्तसेवा.) :– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या राजुरा आगमनावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत करून परिसर दुमदुमवून टाकला.

Also Read : वाघाचा हल्ला आणि 9 तास रस्ता रोको आंदोलन

गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी दौर्‍यावर असताना श्री. सपकाळ हे परतीच्या प्रवासात सायंकाळी राजुराला थोडा वेळ थांबले. संविधान चौकात स्थित भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना भेट दिली. यावेळी राजुरा काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

आगामी निवडणुकांमध्ये जोमाने काम करा

या भेटीदरम्यान प्रदेशाध्यक्ष श्री. सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे गांभीर्याने पाहण्याचे, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचे आणि आगामी निवडणुकांमध्ये जोमाने काम करण्याचे आवाहन केले. जनतेचा विश्वास आणि पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवा, असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थितांना केले.

Diwali ad


यावेळी राजुरा काँग्रेसचे प्रमुख नेते, राजुरा तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस तसेच युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल, ओबीसी काँग्रेस, अनुसूचित जाती विभाग काँग्रेस, अनुसूचित जमाती विभाग काँग्रेस, अल्पसंख्यांक काँग्रेस, किसान काँग्रेस यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घोषणांनी परिसर दुमदुमला आणि वातावरणात उत्साह संचारला. स्थानिक कार्यकर्त्यांनीही प्रदेशाध्यक्षांच्या या भेटीला ऐतिहासिक ठरवत, प्रदेशाध्यक्षांचा ऊर्जावान संदेश म्हणजे काँग्रेसला नवचैतन्य देणारा क्षण अशी भावना व्यक्त केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment