Hatloni village farmer death
Hatloni village farmer death : चंद्रपूर – अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान व कर्जाला त्रासून कोरपना तालुक्यातील हातलोणी येथील तरुण शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन केल्याची घटना ७ ऑक्टोबर रोजी घडली. गजानन पुनम मालेकर 38 रा.हातलोणी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
Also Read : अंमली पदार्थ रोका चंद्रपूर वाचवा, भाजपचे पोलीस प्रशासनाला निवेदन
उपचारादरम्यान मृत्यू
सतत येणाऱ्या अति पावसामुळे शेतीचे होणारे नुकसान व कर्ज असल्याने तो चिंताग्रस्त असल्याचे समजते. मंगळवारी रात्री विष प्राशन केल्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे आणण्यात आले.त्यानंतर त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. उपचारादरम्यानच त्याचा मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास रुग्णालयातच मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवाचे बुधवारी शव विच्छेदन करण्यात आले.
त्याची कुकुडबोडी येथील शेत शिवारात एक हेक्टर शेत जमीन आहे. त्याच्यावर जिल्हा बँकेचे कर्ज होते. त्यांच्या मागे आई वडील , पत्नी , एक मुलगा ,एक मुलगी व बराच मोठा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.










