Maharashtra Nagarparishad Reservation । ⚡ चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद आरक्षण जाहीर, कोण होणार तुमचा नगराध्यक्ष?

Maharashtra Nagarparishad Reservation । ⚡ चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद आरक्षण जाहीर, कोण होणार तुमचा नगराध्यक्ष?

Maharashtra Nagarparishad Reservation

Maharashtra Nagarparishad Reservation : चंद्रपूर – राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. आरक्षण जाहीर झाल्यावर राजकीय पुढाऱ्यांचे स्वप्न भंग झाले आहे, विशेष म्हणजे चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस नगर परिषदेची हि पहिली निवडणूक असणार आहे. नगरपालिकेचा जिल्ह्यातील राजकीय इतिहास बघता भाजप पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. Maharashtra Nagarparishad Nagarpanchayat Reservation

Also Readमुंबई ते चंद्रपूर मेफेड्रोन पावडरचा प्रवास, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नगरपरिषद आरक्षण चंद्रपूर जिल्हा, जिल्ह्यात एकूण १० नगरपरिषद आहे. भद्रावती नगरपरिषद मध्ये मागील २० वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटाची सत्ता होती मात्र राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि कार्यकर्त्यांनी आपले वेगवेगळे मार्ग निवडले त्यामुळे आता ठाकरे गटाला पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी मोठे परिश्रम करावे लागणार आहे. जिल्ह्यातील १० नगरपरिषदेत यंदा महिलाराज स्थापन होणार, १० पैकी ६ नगरपरिषदेत नगराध्यक्ष पद महिलांसाठी राखीव आहे.

नगरपालिका आरक्षण (Nagarparishad Reservation)

  • १ ) घुग्गुस नगरपरिषद अनुसूचित जाती महिला
  • गतवेळचे आरक्षण – पहिलीच निवडणूक
  • २ ) चिमूर नगरपरिषद अनुसूचित जाती महिला
  • गतवेळचे आरक्षण – खुला प्रवर्ग महिला
  • विजेता पक्ष – भाजप
  • ३ ) नागभीड नगरपरिषद अनुसूचित जाती महिला
  • गतवेळचे आरक्षण – अनुसूचित जाती पुरुष
  • विजेता पक्ष – भाजपा
  • ४ ) भद्रावती नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • गतवेळचे आरक्षण – ओबीसी पुरुष
  • विजेता पक्ष – शिवसेना ठाकरे
  • ५ ) वरोरा महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • गतवेळचे आरक्षण – खुला प्रवर्ग
  • विजेता पक्ष – भाजप
  • ६ ) मूल नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
  • गतवेळचे आरक्षण – सर्वसाधारण महिला
  • विजेता पक्ष – भाजप
  • ७ ) बल्लारपूर महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • गतवेळचे आरक्षण – खुला प्रवर्ग
  • विजेता पक्ष – भाजप
  • ८ ) ब्रह्मपुरी नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • गतवेळचे आरक्षण – खुला प्रवर्ग महिला
  • विजेता पक्ष – कांग्रेस
  • खुला प्रवर्ग
  • ९ ) राजुरा खुला प्रवर्ग
  • गतवेळचे आरक्षण – पुरुष ओबीसी
  • विजेता पक्ष – कांग्रेस
  • १० ) गडचांदूर खुला प्रवर्ग
  • गतवेळचे आरक्षण – अनुसूचित जमाती महिला
  • विजेता पक्ष – कांग्रेस

नगरपंचायत आरक्षण (Nagarpanchayat Reservation)

  • १ ) गोंडपिपरी नगरपंचायत अनुसूचित जाती महिला
  • गतवेळचे आरक्षण –
  • विजेता पक्ष –
  • २ ) सिंदेवाही अनुसूचित जमाती प्रवर्ग
  • गतवेळचे आरक्षण –
  • विजेता पक्ष –
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • ३ ) पोंभुर्णा
  • गतवेळचे आरक्षण – खुला महिला
  • विजेता पक्ष – भाजप
  • ४ ) जिवती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग
  • गतवेळचे आरक्षण –
  • विजेता पक्ष
  • ५ ) सावली ओबीसी महिला
  • गतवेळचे आरक्षण – सर्वसाधारण महिला
  • विजेता पक्ष – कांग्रेस
  • ६ ) भिसी अनुसूचित जाती प्रवर्ग (पहिलीच निवडणूक)
  • गतवेळचे आरक्षण –
  • विजेता पक्ष –

प्रभाग आरक्षण सोडत ७ व ऑक्टोबर रोजी

 बल्लारपूर नगर परिषदेची आरक्षण सोडत 7 ऑक्टो. रोजी दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मूल, अजय चरडे), वरोरा न.प. आरक्षण सोडत 7 ऑक्टो. रोजी दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वरोरा, संदीप भस्के), नागभीड 7 ऑक्टो. दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ब्रम्हपूरी, पर्वणी पाटील), गडचांदूर 7 ऑक्टो. दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजुरा, रविंद्र माने), चिमूर न.प. आरक्षण सोडत 7 ऑक्टो. दुपारी 3 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर, डॉ. संतोष थिटे). Maharashtra Nagarparishad Reservation

मूल न.प. आरक्षण सोडत 8 ऑक्टो. दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मूल, अजय चरडे), भद्रावती 8 ऑक्टो. रोजी दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वरोरा, संदीप भस्के), ब्रम्हपुरी 8 ऑक्टो. दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी, पर्वणी पाटील), राजुरा 8 ऑक्टो दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजुरा, रविंद्र माने), भिसी नगर पंचायतीची आरक्षण सोडत 8 ऑक्टो दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी चिमूर, डॉ. संतोष थिटे) आणि घुग्घुस न.प. आरक्षण सोडत 8 ऑक्टो. दुपारी 12 वाजता (पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी, लघिमा तिवारी) Maharashtra Nagarparishad Reservation

आरक्षण निश्चित करण्याच्या सोडतीच्या वेळी वरील नगर परिषद / पंचायतीच्या क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी केले आहे.

मतदार यादी अंतिम करण्याकरीता प्राधिकृत अधिका-यांची नेमणूक : 

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, मुल, घुग्घुस, गडचांदूर, चिमूर, राजुरा, नागभीड या नगरपरिषदांमधील व भिसी नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम 2025 जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने 8 ते 13 ऑक्टो. 2025 पर्यंत प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करून प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम करावयाची आहे.

बल्लारपूर न.प. (प्राधिकृत अधिकारी तहसीलदार बल्लारपूर), वरोरा न.प. (प्रा. अधि. तहसीलदार वरोरा), भद्रावती न.प. (तहसीलदार भद्रावती), ब्रम्हपुरी न.प. (तहसीलदार ब्रम्हपुरी), मूल न.प. (तहसीलदार मूल), घुग्घुस न.प. (तहसीलदार चंद्रपूर), चिमूर न.प. (तहसीलदार चिमूर), नागभीड न.प. (तहसीलदार नागभीड), राजुरा न.प. (तहसीलदार राजूरा), गडचांदूर न.प. (तहसीलदार कोरपना), भिसी न.पं. (अपर तहसीलदार भिसी).

उपरोक्तप्रमाणे प्राधिकृत केलेल्या अधिका-यांनी प्रारूप मतदार यादीवर 8 ते 13 ऑक्टो 2025 पर्यंत प्राप्त होणाऱ्या  हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करून निर्णय घ्यावा व आवश्यक असल्यास योग्य त्या सुधारणा मतदार यादीत कराव्यात, असे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी कळविले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment