Mahavitaran contract workers Diwali bonus | महावितरण कंत्राटी कामगारांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी, दिवाळीपूर्वी बोनसाची ग्वाही!

Mahavitaran contract workers Diwali bonus | महावितरण कंत्राटी कामगारांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी, दिवाळीपूर्वी बोनसाची ग्वाही!

Mahavitaran contract workers Diwali bonus

Mahavitaran contract workers Diwali bonus : चंद्रपूर 19 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा): महावितरण कडून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची बैठक दि.16 ऑक्टोबर रोजी संचालक मा. राजेंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यात प्रामुख्याने पुनर्रचनेमूळे एक ही कंत्राटी कामगार कमी होणार नाही उलट 10% अधिक कामगार वाढवणार असल्याची ग्वाही संचालक मा. राजेंद्रजी पवार यांनी संघटनेला दिली.

Also Read : घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक

मा.औद्योगिक न्यायालयाकडून संरक्षण दिलेल्या कंत्राटी कामगारांच्या नावाची यादी राज्यातील सर्व विभागाला पुन्हा पाठवू, कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील व सेवा ज्येष्ठता यादी नुसार शेवटी कामाला लागलेला कामगार आधी कमी केला जाईल या बाबत फिल्डवर सूचना दिल्या जातील असे महावितरण मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांनी सांगितले. electricity workers wage settlement before Diwali

वेतन न देणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका

राज्यात ज्या कामगारांमुळे घरा घरात उजेड राहातो त्या कामगारांची दिवाळी अंधारात जायला नको या साठी दिवाळी पूर्वी वेतन न देणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे असे मत संघटनेने व्यक्त केले असता चालू व थकीत वेतन, तसेच मागील फरक व बोनसची रक्कम तातडीने देण्याचे निर्देश पवार यांनी दिले.

Diwali ad

बैठीकसाठी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे व कार्याध्यक्ष अमर लोहार सहीत निखिल टेकवडे उपस्थित होते.

कंत्राटी कांमगारांच्या अनेक प्रलंबित विषयासाठी नोव्हेंबर महिन्यात पुन्हा सविस्तर बैठक घेणार असल्याचे संचालक राजेंद्र पवार यांनी सांगितले.

Sharing Is Caring:

Leave a Comment