Mephedrone trafficking cases Chandrapur । चंद्रपूरमध्ये पोलिसांची मोठी कामगिरी! १६० ग्रॅम एमडी पावडर सह दोन ताब्यात

Mephedrone trafficking cases Chandrapur । चंद्रपूरमध्ये पोलिसांची मोठी कामगिरी! १६० ग्रॅम एमडी पावडर सह दोन ताब्यात

Mephedrone trafficking cases Chandrapur

Mephedrone trafficking cases Chandrapur : चंद्रपूर – २८ ऑक्टोबर (News 34 वृत्तसेवा) – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने वर्ष २०२५ मध्ये एमडी तस्करांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली, या मालिकेत ५०० ग्राम च्या वर एमडी पावडर जप्त केले होते. तरुणाई अंमली पदार्थाच्या जाळ्यात अडकत चालली असून या जाळ्यातून पोलीस प्रशासन तरुणाईला वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

चंद्रपुरात २७ ऑक्टोबरला स्थानिक गुन्हे शाखेने माहितीच्या आधारावर कारवाई करीत तब्बल १६० ग्राम एमडी पावडर जप्त केले, या प्रकरणी दोन आरोपीना अटक करीत तब्बल १६ लक्ष १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Also Read : दुभाजक नको रस्ता हवा, जनविकास सेना आक्रमक

दोन इसम चंद्रपुरात एमडी पावडर घेऊन येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने वन अकादमी मूल रोडवर नाकाबंदी केली, यावेळी चारचाकी वाहन क्रमांक एमएच ४९ एएस २७०४ हे संशयित वाहन पोलिसांना दिसताच त्यांनी वाहन थांबवित झडती घेतली असता त्यामध्ये १६० ग्राम मेफेड्रोन पावडर आढळून आले. Police crackdown on drug peddlers Chandrapur

पोलिसांनी या प्रकरणात चालक २८ वर्षीय दीपक कृष्णा वर्मा राहणार संजयनगर चंद्रपूर व ३० वर्षीय आशिष प्रकाश वाळके राहणार मित्रनगर चंद्रपूर यांना ताब्यात घेत त्यांचेवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपस स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

तस्करी व तस्करांची संख्या वाढणार

चंद्रपुरात झटपट पैसे कमविण्याच्या नादात युवक हे एमडी पावडर ची तस्करी करण्यात गुंतले आहे, १० हजार रुपयांचे काही दिवसात १ लाख रुपये नफा होत असल्याने युवक अंमली पदार्थाचा अवैध व्यवसाय करू लागले आहे. या प्रकरणातील आरोपी वर्मा यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे तर वाळके नामक आरोपीवर कसलाही गुन्हा दाखल नसल्याची माहिती आहे. रेकॉर्डवरील आरोपी सोडून ज्यांच्यावर गुन्हे नाही ते युवक एमडी पावडरची तस्करी करू लागले आहे. येणाऱ्या काळात तस्करी व तस्करांची संख्या वाढणार हे निश्चित. Mephedrone trafficking cases Chandrapur

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, पोउपनि सर्व्हेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, हिरालाल गुप्ता व अजित शेंडे यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment