MIDC Tadali coal depot pollution
MIDC Tadali coal depot pollution : चंद्रपूर | २० ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) : एमआयडीसी ताडाळी परिसरातील अवैध कोल डेपोमुळे वाढत चाललेल्या प्रदूषणाविरोधात नागरिकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन सादर करून अवैध कोल डेपोवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Also Read : अवघ्या 6 तासात घरफोडीचा गुन्हा उघडकीस, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या अवैध डेपोमधून मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त कोळसा साठवला जात असून त्यामुळे परिसरात धूळ व वायूप्रदूषणाचे गंभीर स्वरूप निर्माण झाले आहे. या प्रदूषणाचा थेट परिणाम शेतीवर व आरोग्यावर होत असून, शेतकऱ्यांचे नुकसान वाढत आहे.

कोलडेपो बंद करा
नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी तातडीने उपाययोजना करून अवैध कोल डेपो बंद करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत उप प्रादेशिक अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांनाही देण्यात आली आहे.










