Murder Case Police Crackdown | तो फोनवर द्यायचा शिवीगाळ; 6 जणांनी मिळून केला खेळ खल्लास

Murder Case Police Crackdown | तो फोनवर द्यायचा शिवीगाळ; 6 जणांनी मिळून केला खेळ खल्लास

Murder Case Police Crackdown

Murder Case Police Crackdown : चंद्रपूर 23 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) आई-बहिणीच्या शिव्या दिल्याने 27 वर्षीय युवकाची 6 जणांनी चाकू भोसकून हत्या केली, गुन्ह्याची माहिती मिळताच चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या कौशल्यपूर्ण तपासाने अवघ्या 1 तासात सर्व आरोपींना अटक करण्यास यश मिळविले.

Also Read : चंद्रपुरात 31 हजार दिव्यांचा दीपोत्सव


23 ऑक्टोबर रोजी चंद्रपुरातील लॉ कॉलेज परिसरात एका युवकाचा मृतदेह पडून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी पोहचत पाहणी केली. सदर मृतदेह हा दुर्गापुरातील बेताल चौकात राहणाऱ्या 27 वर्षीय नितेश वासुदेव ठाकरे यांचा असल्याची ओळख पटली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी आरोपीच्या शोध घेण्यासाठी पथक तयार केले, अवघ्या 1 तासात गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने 6 आरोपींना अटक केली. Law College murder Chandrapur update

घटना नेमकी काय घडली?


ताडोबा मार्गावर 25 वर्षीय सुजित जयकुमार गणवीर यांचा पानठेला आहे, त्याठिकाणी मृतक नितेश खर्रा घोटण्याचे काम करीत होता, मात्र 3 दिवसांपूर्वी मृतक नितेश ने सुजित ला दिवाळीचे कपडे घ्यावे अशी इच्छा सुजितकडे व्यक्त केली, मात्र सुजितने त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

यामुळे सुजित गणवीर व नितेश यांच्यात वाद झाला, या वादात नितेश ने सुजित ला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली. विशेष बाब म्हणजे मागील 3 दिवसापासून नितेश सुजितला कॉल करून शिवीगाळ करीत होता.
नितेश ने शिवीगाळी केली याचा राग सुजित ने मनात पकडून ठेवला होता, नितेश चा काटा काढायचा याबाबत सुजित ने योजना आखली, आपल्यासह 6 जणांना सुजित ने या कटात सहभागी केले. Chandrapur local crime branch news

Diwali ad


22 ऑक्टोबर ला सुजित ने नितेश ला कॉल करीत आपण चित्रपट बघायला जाऊ म्हणून सोबत घेतले, चित्रपट संपल्यावर सुजित आपल्या सहकाऱ्यांसह लॉ कॉलेज परिसरात गेला, त्याठिकाणी त्यांनी दारू प्यायली, नितेश दारू च्या नशेत बघत सुजित व त्याच्या सहकाऱ्यांनी हल्ला चढविला. सुजित सह 6 जणांनी त्याच्यावर चाकूने वार केले, या हल्ल्यात नितेश चा जागीच मृत्यू झाला. आरोपीनी लॉ कॉलेजच्या झुडपात नितेश चा मृतदेह ठेवत तिथून पळ काढला. आरोपीनी नितेश ची दुचाकी सोबत घेत सिनाला जवळ आगीच्या हवाली केले. Maharashtra crime branch breakthrough


दुसऱ्या दिवशी सकाळी नितेश चा मृतदेह मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती दिली.
स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपी सुजित जयकुमार गणवीर, 23 वर्षीय तौसिफ अजीज शेख, 22 वर्षीय प्रतीक माणिक मेश्राम, 22 वर्षीय अनिल रामेश्वर बोंडे, 19 वर्षीय यश छोटेलाल राऊत व 22 वर्षीय करण गोपाल मेश्राम सर्व राहणार दुर्गापूर यांना अवघ्या 1 तासात अटक केली.

तर नितेश चा जीव वाचला असता

चंद्रपुरात निर्जन ठिकाणी अवैध व बेकायदेशीर हालचाली बघता तत्कालीन पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी शहरातील निर्जन ठिकाणी नियमित पेट्रोलिंग करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या, लॉ कॉलेज परिसरात दारू पिणे, अंमली पदार्थाचे सेवन करणे ही नित्याची बाब आहे, मात्र रामनगर पोलिसांनी त्याठिकाणी पेट्रोलिंग केली नाही, आधीच पोलिसांनी या ठिकाणी होत असलेल्या बेकायदेशीर हालचालीवर प्रतिबंध केला असता तर नितेश ला आपला जीव गमवावा लागला नसता. Murder Case Police Crackdown

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनी विनोद भुरले, पोउपनी सुनील गौरकार, संतोष निंभोरकर, सर्व्हेश बेलसरे, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इमरान खान, अजय बागेसार, स्वामीदास चालेकार, नितीन साळवे, प्रमोद डंबारे, हिरालाल गुप्ता, शशांक बदामवार व शेखर माथनकर यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment