Nagpur voter registration for graduates
Nagpur voter registration for graduates : चंद्रपूर, दि. 06 : भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पदवीधरांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे. Graduate voter list Nagpur division 2025
Also Read : चंद्रपुरात ५२८ ग्राम एमडी पावडर जप्त
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शुभम दांडेकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, पदवीधर मतदारसंघाच्या यादीत नाव नोंदणीकरीता जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 6 नोव्हेंबर 2025 असून सर्व पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
असा आहे पदवीधर मतदारसंघ पुनरिक्षण कार्यक्रम :
1) मतदार नोंदणी अधिनियम, 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 30 सप्टेंबर 2025, 2) कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी 15 ऑक्टोबर 2025 रोजी, 3) वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी 25 ऑक्टोबर 2025 रोजी, 4) प्रकरणपरत्वे नमुना 18 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 6 नोव्हेंबर 2025, 5) हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई 20 नोव्हेंबर,
6) प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी 25 नोव्हेंबर रोजी, 7) दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी (मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 12 अंतर्गत) 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 पर्यंत, 8) दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे 25 डिसेंबर रोजी आणि 9) मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी 30 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येईल.










