Police appreciation Bahujan Hitkarini Sabha | पोलिसांची उत्कृष्ट व्यवस्था, चंद्रपूर पोलिसांचे आभार

Police appreciation Bahujan Hitkarini Sabha | पोलिसांची उत्कृष्ट व्यवस्था, चंद्रपूर पोलिसांचे आभार

Police appreciation Bahujan Hitkarini Sabha

Police appreciation Bahujan Hitkarini Sabha : चंद्रपूर 25 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – दिनांक 15, 16 ऑक्टोबर च्या दीक्षाभूमी, चंद्रपूर येथील महोत्सवात उत्कृष्ट व्यवस्था ठेवल्या बदल बहुजन हितकारिणी सभेने चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मान. मुम्मका सुदर्शन यांचे अभिनंदन केले आहे.

Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा वाघाचा हल्ला, शेतकऱ्याला केले ठार

यासंबंधाने नागवंश नगराळे, एड. पूनमचंद वाकडे, एड. रवींद्र मोटघरे, जितेंद्र डोहणे, बंडू ठमके, विद्याधर लाडे, रवींद्र भैसारे इ. च्या शिष्टमंडळाने दिनांक 24 ऑक्टो. ला मम्मका सुदर्शन यांची भेट घेऊन धन्यवाद प्रकट केले . मागील दोन वर्षांपासून दीक्षाभूमी परिसर व संबंधित रोडवर आवश्यक तिथे बॅरिकेट्स लावून, पादचाऱ्यांना टू- वे मार्गाची व्यवस्था केल्याने गर्दीचे योग्य नियोजन झाले.

Diwali ad

बॅड एलिमेंट्सना वचक

अनेक ठिकाणी वाहन तळे उपलब्ध केल्याने वाहणांची योग्य व्यवस्था झाली. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पोलीस जवान उपस्थित ठेवल्याने ‘ बॅड एलीमेन्टसना ‘ वचक बसला. यास्तव जरी हे पोलीस विभागाचे कर्तव्य असले तरी मागील वर्षी या बाबी बहुजन हितकारिणी सभेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन चोख बंदोबस्ताची मागणी केली होती, त्यावर मागील वर्षीपासून योग्य प्रतिसाद मिळाल्याने पोलीस प्रशासन अभिनंदनास पात्र असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

Sharing Is Caring:

Leave a Comment