Protest against the Mahayuti government । शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसैनिक आक्रमक; चंद्रपूरात धरणे आंदोलन!

Protest against the Mahayuti government । शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसैनिक आक्रमक; चंद्रपूरात धरणे आंदोलन!

Protest against the Mahayuti government

Protest against the Mahayuti government : चंद्रपूर: महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात आणि त्यांच्या निष्क्रियतेविरोधात आवाज उठवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन केले. जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची ३१ हजार ६२८ कोटीची मदत

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी स्पष्ट केले की, “शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर उतरला आहे आणि जोपर्यंत जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.” अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या अतोनात नुकसानीनंतरही शासनाकडून कोणतीही ठोस मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे, तोच या आंदोलनातून व्यक्त करण्यात आला.

प्रमुख मागण्या

शेतकऱ्यांच्या हितासाठी पक्षाने शासनासमोर खालील प्रमुख सात मागण्या (Seven Key Demands) ठेवल्या आहेत:

  1. चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्यात यावा.
  2. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती (Complete Loan Waiver) झाली पाहिजे.
  3. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना प्रति हेक्टरी ५०,०००/- रु. तत्काळ मदत (Immediate Relief of ₹50,000 per Hectare) मिळावी.
  4. शेतकऱ्यांचा पीक विमा (Crop Insurance) सुरुवातीच्या नियमांनुसार शिथिल करून, नव्याने लागू केलेला ‘एकच ट्रिगर’ (Single Trigger) पद्धत बंद करावी आणि पहिल्याप्रमाणे पीक विमा योजना लागू करावी.
  5. राज्य सरकार सोबतच केंद्र सरकारने सुद्धा मोठा पॅकेज (Special Package from Central Government) जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
  6. पावसाच्या अतिवृष्टी व पूर (Heavy Rain and Flood) यामुळे वाहून गेलेल्या शेतकरी बांधवांच्या गुरे-जनावरांचा मोबदला (Compensation for Livestock Loss) त्वरित देण्यात यावा.
  7. कापसाला ₹१५,०००/- प्रति क्विंटल आणि सोयाबीनला ₹१०,०००/- प्रति क्विंटल हमीभाव (Minimum Support Price – MSP) देण्यात यावा.

आंदोलनात प्रमुख उपस्थिती:

या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख प्रा. शालिक फाले, बबन उरकुडे, माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे, माजी जिल्हा संघटिका कुसुम उदार ताई, महानगर प्रमुख सुरेश पचारे, युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे, उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, माजी तालुका प्रमुख (चंद्रपूर) संतोष नरुले, मूल तालुका प्रमुख राजू ठाकरे, पोंभुर्णा तालुका प्रमुख आशिष कावटवार, चंद्रपूर तालुका प्रमुख विकास वीरूटकर, राजुरा तालुका प्रमुख रमेश झाडे, मूल शहर प्रमुख बादल करपे, युवासेना समन्वयक विनय धोबे, युवासेना शहर प्रमुख (पोंभुर्णा) महेश श्रीगिरवार, उपमहानगर प्रमुख सिकंदर खान, सोनू ठाकूर, प्रमोद कोलारकर, अरमान शेख, लोकेश कोटरंगे, वैभव काळे, सागर धनस्कर, रिझवान पठाण, रोहन आंबटकर, फैझान खान, सूरज शेंडे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या धरणे आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महायुती सरकार काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment