Public Holiday October 16 । चंद्रपूर दीक्षाभूमी येथील १६ ऑक्टोबरच्या ऐतिहासिक धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनासाठी सार्वजनिक सुट्टी?

Public Holiday October 16 । चंद्रपूर दीक्षाभूमी येथील १६ ऑक्टोबरच्या ऐतिहासिक धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनासाठी सार्वजनिक सुट्टी?

Public Holiday October 16

खासदार प्रतिभा धानोरकर यांची आक्रमक मागणी

Public Holiday October 16 : चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरनंतर १६ ऑक्टोबर १९५६ रोजी ज्या चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एक ऐतिहासिक क्रांती घडवली, त्याच दिवशी सार्वजनिक सुट्टी नसल्याने लाखो लोकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा थेट मुद्दा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांच्याकडे १६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी तातडीने जाहीर करण्याची लोकहितकारी मागणी केली आहे.

Also Read : रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

या मागणीचे गांभीर्य स्पष्ट करताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नमूद केले की, १६ ऑक्टोबर रोजी देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी आणि बौद्ध धर्मीय बांधव चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर अखंड श्रद्धेने अभिवादन करण्यासाठी येतात. हा दिवस सामाजिक समता आणि क्रांतीचे प्रेरणास्रोत आहे. Deekshabhoomi Day Public Holiday

सुट्टी जाहीर करा

“सध्या १६ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी नसल्यामुळे शासकीय, निमशासकीय कर्मचारी, तसेच विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कामावरून रजा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. परिणामी, त्यांना त्यांच्या श्रद्धेचा मान राखणे आणि या पवित्र सोहळ्यात सहभागी होणे शक्य होत नाही. हा विषय लाखो लोकांच्या धार्मिक व सामाजिक श्रद्धेशी जोडलेला आहे,” असे थेट मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात मांडले आहे.

लाखो अनुयायांच्या धार्मिक आणि सामाजिक भावनांचा आदर करण्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी १६ ऑक्टोबर या पवित्र दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यासाठी सार्वजनिक सुट्टी तातडीने जाहीर करणे काळाची गरज आहे. प्रशासनाने या महत्त्वपूर्ण लोकहितकारी मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रहपूर्ण विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विभागीय आयुक्तांना केली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो अनुयायांना शांतता आणि उत्साहाने या ऐतिहासिक स्थळी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment