quick police investigation Chandrapur
quick police investigation Chandrapur : चंद्रपूर 20 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – चंद्रपूर शहरातील घुटकाला प्रभागात घरफोडी प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 6 तासात करीत 2 आरोपींसह 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
19 ऑक्टोबर रोजी घुटकाला वार्डातील नेहरू शाळेच्या मागील भागात राहणारे फिर्यादी 27 वर्षीय मंगेश प्रमोद रामटेके हे आपल्या कुटुंबासह बाहेर गेले होते, 20 ऑक्टोबर रोजी रामटेके कुटुंब घरी परतले असता अज्ञातांनी घराचे कुलूप तोडत रोख व सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज लांबविला होता. सदर घरफोडी प्रकरणी मंगेश रामटेके यांनी शहर पोलिसात तक्रार केली. crime crackdown in Chandrapur
Also Read : 70 वर्षीय शेतकऱ्यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
तक्रार प्राप्त होताच सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू करीत खबरी कडून गोपनीय माहिती घेतली असता चंद्रपुरात 2 इसम सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहे अशी पक्की माहिती प्राप्त झाली.
गडचांदुरातील आरोपी
माहितीच्या आधारे पथकाने 28 वर्षीय आरिफ कलंदर शेख व 20 वर्षीय गौरव उर्फ प्रफुल बोझोकर दोन्ही राहणार गडचांदूर यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी घुटकाला भागात घरफोडी केल्याची कबुली दिली.
दोन्ही इसम हे रेकॉर्डवरील आरोपी आहे. दोन्ही आरोपिकडून पोलिसांनी 2 लाख 90 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत पुढील तपासासाठी आरोपींना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर प्रकरणाची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनी विनोद भुरले, पोउपनी सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे, दीपक डोंगरे, इमरान खान, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता व शशांक बदामवार यांनी केली.










