Sai Deepotsav Chandrapur 2025
Sai Deepotsav Chandrapur 2025 : चंद्रपूर 23 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – वर्षभर सातत्याने सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारी श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर वर्षभरात एकदाच अध्यात्मिक कार्यक्रम दीपोत्सव दिवाळी च्या पावन-पर्वावर सादर करीत असते यावर्षीचा दीपोत्सव हा रविवार दिनांक 19 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता सरदार पटेल महाविद्यालय,गंजवार्ड, चंद्रपूर येथे पार पडला.
Also Read : मनपा निवडणुकीसाठी चंद्रपुरातील इच्छुक उमेदवारांकडून कांग्रेसने मागविले अर्ज
31 हजार दिव्यांचा दीपोत्सव
हा ख्याती प्राप्त दीपोत्सव महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असतो यावर्षी प्रतिष्ठान तर्फे 31000 दिव्यांची आरास श्री साईबाबा चरणी अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला यावर्षी प्रतिष्ठान तर्फे साईबाबांचा जिवंत पालखी देखावा, श्री साईबाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांची प्रदर्शनी, चंद्रपूरच्या दिग्गज कलाक्षेत्रातील श्री सुहास दुधलकर यांनी साकारलेली जिवंत रांगोळी सर्वांना मोहून गेली तर संपूर्ण दिव्यांची आरास चंद्रपूरची दिग्गज कलाशिक्षक श्री संजय अंडरस्कर यांनी रेखाटली तर त्यांच्या सोबतीला प्रसिद्ध कला चित्रकार श्री सुदर्शन बारापात्रे व श्री किरण पराते यांनी सहकार्य दिले. Sai Seva Sankalp Pratishthan Diwali event
संपूर्ण परिसर साईमय वातावरणात 31 हजार दिव्यांनी लखलखत होता,सोबतीला सुमधुर साई भक्ती संगीत संध्येने कार्यक्रमांला वेगळेच रूप प्राप्त झाले. पटाख्याची आतीषबाजी प्रमुख आकर्षण होते.संपूर्ण कार्यक्रमाला शहराच्या बाहेरून सुद्धा लोकांनी उपस्थिती दर्शवून दीपोत्सवाचा आनंद घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुकुंज आश्रम मोझरी चे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणराव गमे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री मारोतराव मत्ते उपाध्यक्ष डॉक्टर भानुदासजी दाबेरे,समाजसेवक श्री संजय बुरघाटे, श्री दिनेश जी चोखारे, श्री लोटी भाई पटेल, दाताळा साई मंदिराचे अध्यक्ष राजू नागरकर, श्री अनिल तहिल्यांनीं, श्री अरुण तिखे यांची यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात श्री साईबाबांच्या चरणी मान्यवरांच्या हस्ते द्रिप प्रज्वलन व 31 दिव्यांनी आरती करून झाली. lamp lighting ceremony Sai Baba Chandrapur
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सचिन गाटकीने यांनी केले त्यानंतर अध्यक्ष भाषण श्री लक्ष्मणराव गमे यांनी केले यानंतर उपस्थित सर्व साई भक्तांनी 31 हजार दीप प्रज्वलित करण्याचे आव्हान करण्यात आले, कार्यक्रमाचे संचालन सौ प्रज्ञा जीवनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री विनोद गोवारदिपे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रतिष्ठानचे प्रमोद वरभे, रुपेश महाडोळे,नेमराज पोडे, पंकज निमजे सचिन बरबटकर, कृणाल खणके,रोशन निनावे,तुषार राहुड,पवन कामतकर,जयवंत खंडाळकर,आशा यादव, भास्कर खट्टी सुरेश सातपुते, अनिल कोरेकर,लक्ष्मण बोनगीरवार,प्रकाश नांढा,नंदकिशोर मैंदरळकर,देवेंद्र लांजे सुनील मांडवकर, नितीन गेडाम, राम नागपुरे,चंदू रणदिवे,सक्षम रणदिवे, दत्तात्रय झुलखंतीवार, प्रदीप रणदिवे,आशिष वासेकर, संजीवनी चहारे,पुनम नवले,इंद्रायणी गाटकीने, मंजुषा पोडे,प्रीतम रागीट, भारती शिंदे,पूजा लांजे, अनिरुद्ध यादव,आराध्या गटकीने मुरलीधर शिरभय्ये इत्यादींनी परिश्रम घेतले.










