skill training short term courses
skill training short term courses : चंद्रपूर, दि. 13 : कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागामार्फत अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम (शॉर्ट टर्म कोर्सेस) या उद्योगस्नेही व नवयुगीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने राज्यात नुकतेच या अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कौशल्य, विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून स्थानिक पातळीवर या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
Also Read : १६ ऑक्टोबर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाची सुट्टी द्या
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 18 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून 6 शासकीय तंत्र माध्यमिक शाळा आहेत. सन 2025-26 या शैक्षणिक सत्रात संपूर्ण जिल्ह्यात 1145 विद्यार्थ्यांनी शॉर्ट टर्म करीता प्रवेश घेतला असून यात 138 जणांनी न्यू ऐज कोर्स, 141 मुलींच्या संबंधित कोर्सेस, 157 जण संगणकाशी संबंधित तर 709 विद्यार्थ्यांनी व्होकेशनल संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. Chandrapur Short Term Skill Courses
असे आहेत नवीन शॉर्ट टर्म अभ्यासक्रम :
चंद्रपूर जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण आणि रोजगारक्षम अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे. यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, ॲडेक्टिव्ह मॅन्युफॅक्चरींग, इलेक्ट्रिकल व्हेईकल टेक्नॉलॉजी, सोलर एनर्जी, सर्व्हिस टेक्निशिअन (होम अल्पायंन्सेस), ड्रोन टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरीटी तसेच महिलांसाठी विशेष अभ्यासक्रम, डीजीटल मित्र, सोशल मिडीय इन्फ्ल्युएंसन, सेल्फ ऐप्लॉईड टेलर, कॉसमेटॉलॉजी, ब्युटी पार्लर असे आधुनिक व्यवसाय अभ्यासक्रम समाविष्ट आहेत.
प्रवेश घेण्यासाठी पात्रता
: या अभ्यासक्रमांसाठी पात्रता म्हणून आयटीआय प्रशिक्षण घेत असलेले किंवा उत्तीर्ण विद्यार्थी, उच्च व तंत्रशिक्षणातील पदवीधर किंवा पदविकाधारक तसेच दहावी/बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
येथे करा नोंदणी : नोंदणी खालील संकेतस्थळांवर करता येईल. 1. https://admission.dvet.gov.in
अधिक माहितीसाठी व प्रवेश नोंदणीसाठी जिल्ह्यातील जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा शासकीय तांत्रिक विद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनगीरवार यांनी केले आहे.










