Tiger terror in chandrapur district
Tiger terror in chandrapur district : गोंडपिपरी (चंद्रपूर 26 ऑक्टोबर News34): गोंडपिपरी (Gondpipri Taluka) तालुक्यात वन्यजीव हल्ल्यांची मालिका सुरूच असून, येथील गणेशपिपरी (Ganeshpipri) गावात वाघाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालत एका महिलेचा बळी घेतला आहे. आज, सोमवार (दि. २७ ऑक्टोबर), सायंकाळच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. यामुळे तालुक्यात प्रचंड दहशत (Terror) आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. Woman killed by tiger Gondpipri cotton field
Also Read : नागभीड मधील त्या हल्लेखोर वाघाचा शोध सुरू
अल्का महादेव पेंदोर (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. मजूर मिळत नसल्याने त्या एकट्याच आपल्या शेतात कापूस वेचणीसाठी (Cotton Picking) गेल्या होत्या. त्यांचे पती बैल घेऊन घरी परतले, मात्र उशिरापर्यंत अल्का घरी न परतल्याने कुटुंबियांना भीती वाटली. गावकऱ्यांनी शोध घेतला असता, शेतशिवारात अल्का यांचा मृतदेह अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.
वनविभागाच्या उपाययोजनांना अपयश
गेल्या काही दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव, वटराणा, गणेशपिपरी आणि चेकपिपरी या भागात वाघाची दहशत वाढली होती. या वाघाने अनेक पाळीव जनावरांची शिकार केली होती.

दुसरा बळी: आठ दिवसांपूर्वी याच वाघाने चेकपिपरी येथील ७० वर्षीय शेतकरी भाउजी पाल यांचा बळी घेतला होता. या घटनेनंतर आमदार देवराव भोंगळे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून वाघाला जेरबंद (Cage/Capture) करण्याचे आदेश मिळवले होते, मात्र वनविभागाला या आदेशांचे पालन करण्यात अपयश आले.
लोकक्षोभ: ८ दिवसांत दोन शेतकऱ्यांचे बळी गेल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट (Anger Wave) पसरली आहे.
सन्मानजनक मदतीसाठी ग्रामस्थांचा पवित्रा
घटनेची माहिती मिळताच वनविभागाची चमू तात्काळ गणेशपिपरी (Gondpipri News) येथे दाखल झाली. मात्र, संतापलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह उचलण्यास स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत या नरभक्षक वाघाला जेरबंद केले जात नाही आणि मृत कुटुंबाला सन्मानजनक आर्थिक मदत (Financial Aid) दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. उशिरापर्यंत गावकऱ्यांचा हा विरोध सुरू होता.
सध्या कापूस वेचणीचा महत्त्वाचा हंगाम सुरू असताना, वाघाच्या भीतीमुळे शेतीत काम करणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरले आहे. या वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
आतापर्यंत 36 बळी
चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची मालिका सुरू झाली आहे, यावर्षी 36 नागरिकांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावला असून यामध्ये 32 वाघाच्या हल्ल्यात, 2 बिबट, एक हत्ती व एकाचा अस्वलीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.










