Villagers road blockade wildlife conflict
Villagers road blockade wildlife conflict : गोंडपिपरी (चंद्रपूर): चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यामुळे (Tiger Attack Chandrapur) निर्माण झालेली दहशत आता लोकआंदोलनात बदलली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी येथील अलका पेंदोर यांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतर आज (सोमवार) गोंडपिपरीमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. परिसरातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि तब्बल नऊ तास अहेरी-चंद्रपूर हा मुख्य रस्ता पूर्णपणे अडवून धरला.
Also Read : चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
सकाळपासूनच गोंडपिपरीमध्ये तणाव
काल (रविवार) वाघाच्या हल्ल्यात अल्का पेंदोर यांचा मृत्यू झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मृतदेह न उचलण्याच्या भूमिकेवरून गावात तणावाची स्थिती होती. आज सकाळी ८ वाजता हा तणाव अधिकच वाढला. परिसरातील अनेक गावांमधून महिला, पुरुष आणि तरुण हजारोंच्या संख्येने गोंडपिपरीच्या मुख्य चौकात जमा झाले. Tiger attack protest Gondpipri Chandrapur
आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून तीव्र निषेध केला आणि चक्काजाम आंदोलन सुरू केले. गोंडपिपरीची संपूर्ण बाजारपेठही आंदोलकांनी पूर्णपणे बंद ठेवली. संतप्त जमावामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे होती. त्यामुळे घटनास्थळी दंगा नियंत्रक पथक आणि अतिरिक्त पोलीस दल (Special Force) बोलवण्यात आले.
नऊ तासांनंतर प्रशासनाचे यश
दिवसभर अनेकदा प्रशासनाकडून समन्वय साधण्याचा प्रयत्न झाला, परंतु आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर (वाघाचा तात्काळ बंदोबस्त आणि कुटुंबाला नुकसान भरपाई) ठाम होते. काही वेळा पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला, पण त्याचा आंदोलकांवर कोणताही परिणाम झाला नाही.
सायंकाळी ५ वाजता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का आणि उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून, त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी दोन दिवसांच्या आत वाघाला जेरबंद (Capture) करण्याची हमी दिली. प्रशासनाच्या या ठोस आश्वासनानंतर तब्बल नऊ तास चाललेले हे तीव्र आंदोलन मागे घेण्यात आले.
शार्प शूटर दाखल, वाहतूक विस्कळीत
या आंदोलनामुळे अहेरी-चंद्रपूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले.
दरम्यान, आंदोलनानंतर तातडीने वाघाला बेशुद्ध करून पकडण्यासाठी अविनाश फुलझेले यांच्या नेतृत्वाखाली दोन शार्प शूटर (Sharp Shooters) गोंडपिपरी येथे दाखल झाले आहेत.










