AI wildlife deepfake video Maharashtra । चंद्रपूर जिल्ह्यात AI चा धुमाकूळ! हा वाघ तर प्रामाणिक निघाला

AI wildlife deepfake video Maharashtra

AI wildlife deepfake video Maharashtra : चंद्रपूर ९ नोव्हेम्बर (News34) – चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी अक्षरक्षा धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागात आता शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहे, शेतात गेलं कि वाघ त्यांची कधी शिकार करणार याचा काही नेम नाही. चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ३८ नागरिकांचा बळी गेला आहे. अश्यातच एक वाघाच्या हल्ल्याचा बनावट व्हिडीओ पुढे आला असून त्यानंतर वाघाने ज्या इसमाची शिकार केली त्याला सुखरुपपणे वाघ परत घेऊन येत आहे.

Also Read : चंद्रपुरात जंगलराज?, पत्रकार व कुटुंबाला पोलिसांसमोर मारहाण

विशेष म्हणजे हे दोन्ही व्हिडीओ AI द्वारे तयार करण्यात आले आहे, वनविभागाने त्या बनावट व्हिडिओची दखल घेत सायबर पोलिसात तक्रार केली आहे. जिल्ह्यात याप्रकारे बनावट व्हिडीओ तयार करीत संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची बाब वनविभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटली आहे.

सध्या देशात AI कुत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच Artificial Intelligence ने धुमाकूळ घातला आहे, AI मुळे व्हिडीओ, ऑडिओ व बातमी हे अगदी सेकंदात तयार होते, या तंत्रज्ञानाचा उपयोग अगदी चांगल्या प्रकारे होत आहे, मात्र त्याचा गैरवापर करण्यात नागरिक मागे नाही. Chandrapur fake tiger attack video AI

चंद्रपूर जिल्ह्यात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ब्रह्मपुरी मधील वनविभागाच्या विश्रामगृहासमोर बसलेल्या व्यक्तीवर वाघ हल्ला करून घेऊन जात आहे असे दाखविले तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये हल्ला केलेल्या इसमाला वाघ हा परत आणून सोडत आहे. एखाद्याने मस्करी करीत सदर व्हिडीओ तयार केला मात्र आता त्याच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे.

Leave a Comment