Chandrapur police raid animal trafficking
Chandrapur police raid animal trafficking : गोंडपिपरी २ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिसांनी जनावरांची अवैध आणि क्रूरपणे वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन पिकअप वाहनांमधून क्रूरतेने दाटीवाटीने कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असलेली एकूण १० गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, त्यांची सुटका करण्यात आली आहे.
Also Read : डॉ संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, कांग्रेसचे निषेध आंदोलन
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता मौजा विठ्ठलवाडा ते भंगाराम तळोथी रोडवरील चेकविठ्ठलवाडा बसस्टॉपजवळ ही कारवाई करण्यात आली.
नेमका प्रकार काय घडला?
पोलीस कर्मचाऱ्यांनी MH-34 BZ 2383 क्रमांकाची पिकअप आणि MH-34 AB 8938 क्रमांकाची अशोक लेल्यॉड छोटी पिकअप ही दोन वाहने थांबवली. तपासणी केली असता, या दोन्ही वाहनांमध्ये क्रूरपणे आणि निदर्यतेने दाटीवाटीने, दोरखंडाने बांधून, तसेच चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता, १० गोवंशीय जनावरे कोंबलेली आढळली. Gondpipri police animal cruelty arrest
जप्त केलेल्या जनावरांची किंमत ८,६४,००० रुपये इतकी आहे. आरोपी हे जनावरे अवैध मार्गाने कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असल्याचे उघड झाले.
चार आरोपींना अटक
या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे:
- सुधाकर पांडुरंग निकोडे (वय ५०, रा. भंगाराम तळोधी, चालक, पिकअप क्र. MH-34 BZ 2383)
- सुधाकर वारलु झाडे (वय ५२, रा. चेकविठ्ठलवाडा, ता. गोंडपिपरी)
- अमर सुदर्शन मडावी (वय ३०, रा. वेळगाव, ता. गोंडपिपरी, चालक, पिकअप क्र. MH-34 AB 8938)
- प्रभाकर हनुमंतु कन्नाके (वय ६०, रा. बामनपेठ, ता. चार्मोर्शि, जि. गडचिरोली)
या चारही आरोपींविरुद्ध गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची यशस्वी कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक, श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक, आणि श्री. सत्यजित आमले, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत सपोनि रमेश हत्तीगोटे, सा. सफौ माणिक वाग्दरकर, पोहवा विलास कोवे (ब.नं. २४१९), पो. अं. सचिन गायकवाड (ब.नं. ११७४), आणि चालक मपोशि. मनिषा ठाकरे (ब.नं. ६०२७) या गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला.










