Chandrapur police raid on illegal brothel । चंद्रपुरातील ‘लकी” चा कारनामा; ताडोबा च्या नावाने ठरला अनलकी

Chandrapur police raid on illegal brothel । चंद्रपुरातील ‘लकी” चा कारनामा; ताडोबा च्या नावाने ठरला अनलकी

Chandrapur police raid on illegal brothel

Chandrapur police raid on illegal brothel : चंद्रपूर, महाराष्ट्र: स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch – LCB) चंद्रपूरने शहरात अवैध मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री उशिरा रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल ताडोबा अतिथी इन, लोहारा येथे छापा टाकून कुंटणखाना चालवणाऱ्या एका हॉटेल मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

मॅनेजर स्वतःच्या फायद्यासाठी चालवत होता अवैध धंदा

स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी रामनगर पोलीस स्टेशन परिसरात नियमित पेट्रोलिंग करत असताना, त्यांना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे ‘लकी’ नावाचा व्यक्ती पीडित महिलांना हॉटेलमध्ये बोलावून त्यांच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता अवैध वेश्याव्यवसाय चालवत आहे.

Also Read : चंद्रपुरात १४० रुपयांची लाच घेताना दोघांना अटक

या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने हॉटेलवर छापा टाकला. छाप्यादरम्यान, आरोपी नामे लकी उर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा (वय २६, रा. अलवर, राजस्थान) हा हॉटेलचा मॅनेजर असून, तो पीडित महिलेकडून वेश्याव्यवसाय करून उपजीविका करत असल्याचे निष्पन्न झाले. Brothel trafficking case Chandrapur 

‘PITA’ ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

आरोपी लकी उर्फ लक्ष्मण शर्मा याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम (PITA Act), कलम ३, ४, ५ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी व्यापार आणि वेश्याव्यवसाय चालवणाऱ्यांविरुद्ध हे कठोर कायदे लागू होतात. Maharashtra law enforcement prostitution

सदरची महत्त्वपूर्ण आणि यशस्वी कारवाई श्री मुम्मका सुदर्शन (पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) आणि श्री ईश्वर कातकडे (अपर पोलिस अधीक्षक, चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या पथकामध्ये विशेष पोलीस अधिकारी अमोल काचोरे (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा), पोउपनी संतोष निंभोरकर, पोउपनी सुनील गौरकर, स.फो. धनराज कारकाडे, पो.हवा. सुरेंद्र महतो, दीपक डोंगरे, पोअ प्रफुल गारघटे, सुमित बरडे, शशांक बादमवार, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, चालक मिलिंद टेकाम, महिला पोलिस छाया निकोडे, अपर्णा मानकर, उषा लेडांगे, निराशा तीतरे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर/AHTU) यांचा समावेश होता.

या कारवाईमध्ये समाजसेविका सरिता मालू, रेखा भारसकडे आणि एनजीओ चंद्रपूर यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

हॉटेल व्यावसायिकांना पोलिसांचे आवाहन

“सर्व लॉजिंग हॉटेल व्यावसायिकांनी अशाप्रकारे अवैध कुंटणखाणी चालवू नयेत. जर कोणत्याही हॉटेलमध्ये अशा प्रकारचा अवैध धंदा चालवताना आढळून आला, तर संबंधित व्यक्ती आणि आस्थापनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

Sharing Is Caring:

Leave a Comment