Chandrapur stamp paper vendor bribery case । चंद्रपुरात १४० रुपयांची लाच घेताना मुद्रांक पेपर्स विक्रेत्याला अटक

Chandrapur stamp paper vendor bribery case । चंद्रपुरात १४० रुपयांची लाच घेताना मुद्रांक पेपर्स विक्रेत्याला अटक

Chandrapur stamp paper vendor bribery case

Chandrapur stamp paper vendor bribery case : चंद्रपूर १ नोव्हेम्बर (News३४ वृत्तसेवा) – चंद्रपूर शहरातील मुद्रांक विक्रेता व मदतनीस यांना १४० रुपयांची लाच घेताना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी जलनगर वॉर्डातील मुद्रांक विक्रेता मनीष अरुण देशमुख व मदतनीस रुपाली भरतलाल चौधरी यांनी वीज टेंडर कामाकरिता तक्रारकर्त्याला १४० रुपये अतिरिक्त मागितले होते.

Also Read : चंद्रपुरात जड वाहतूक बंद होणार, खासदार धानोरकर यांचा प्रशासनाला इशारा

तक्रारदार हे चंद्रपुरातील रहिवासी असून त्यांना वीज टेंडरच्या कामासाठी ५०० रुपयांचे ३ स्टॅम्प पेपर व १०० रुपयांचे ५ स्टॅम्प (मुद्रांक पेपर) हवे होते, मुद्रांक विक्रेत्याने ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अतिरिक्त ३० रुपये असे एकूण ९० रुपये तर १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर अतिरिक्त १० रुपये असे ५० रुपये एकूण १४० रुपये मागितले, तक्रारदाराने मागितलेल्या स्टॅम्प पेपर ची शासकीय किंमत २ हजार रुपये होती त्यावर अतिरिक्त १४० असे एकूण २ हजार १४० रुपयांची मागणी केली, अतिरिक्त पैसे न दिल्यास स्टॅम्प पेपर मिळणार नाही अशी भूमिका मुद्रांक विक्रेता देशमुख यांनी घेतली होती. Chandrapur Bribery Case

रंगेहात अटक

तक्रारदाराला अतिरिक्त पैसे म्हणजेच लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत तक्रार दिली, लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करीत सापळा रचला असता ३१ ऑक्टोबर ला शासकीय शुल्क व्यतिरिक्त १४० रुपयांची लाच मुद्रांक विक्रेता मनीष देशमुख यांनी स्वीकारत ती मदतनीस रुपाली भरतलाल चौधरी यांच्याकडे देत असताना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. यावेळी मुद्रांक विक्रेता देशमुख व मदतनीस चौधरी यांना पुढील तपासकामी अटक करण्यात आली. Stamp Vendor Corruption

महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१५ मध्ये ५०० रुपयांच्या जास्त मूल्याचे छापील मुद्रांकचा वापर बंद केला होता, आता मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी ई चालान सुरु करण्यात आले आहे. पूर्वी जास्त मूल्याच्या मुद्रांक पेपर्स विकल्याने विक्रेत्यांना चांगला फायदा व्हायचा मात्र शासनाच्या निर्णयामुळे त्यांच्या उत्पन्नात तोटा व्हायला लागला त्यामुळे चंद्रपुरात बहुतांश मुद्रांक विक्रेते १० रुपये अतिरिक्त शुल्क घेतात. आता या कारवाईमुळे सध्यातरी मुद्रांक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष बाब म्हणजे मुद्रांक विक्रेत्याला ५०० ते १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर्स ची विक्री केली तर त्यांना ३ टक्के कमिशन शासनाद्वारे मिळते.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश उरकुडे, पोलीस कर्मचारी अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, राजेंद्र चौधरी, पुष्पा काचोळे व सतीश सिडाम यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment