Heavy rainfall crop damage assistance
Heavy rainfall crop damage assistance : चंद्रपूर १४ नोव्हेम्बर (News३४) : अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने चंद्रपूर जिल्हात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या नेतृत्वात निवासी जिल्हाधिकारी कुंभार साहेब यांचे कडे निवेदन सादर केले आहे. चंद्रपुर तालुक्यातील १२६५ नुसकानग्रस्त शेतकऱ्यांचे अतीवृष्टीची मदत निधी प्रलंबित आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज काढण्याची वेळ आली आहे.
Read Also : भाजपला उमेदवार मिळेना
चंद्रपूर जिल्हात अतिवृष्टी मुळे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपुर तालुक्यातील नुकसान झालेल्या १२६५ शेतकऱ्यांना अजुन पर्यंत शेतकऱ्याला अतीवृष्टी ची रक्कम खात्यात आली नाही आहे. महसुल व वन विभागा अतंर्गत दि. १० ऑक्टोंबर २०२५ च्या महाराष्ट्र शासन निर्णयात ज्या शेतकऱ्याची अग्रीस्टॅक मध्ये नोदणीं नाही, अशाना सुद्धा नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे, असे शासन निणर्यात नमुद आहे. मात्र त्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही.
शेतकऱ्यांना त्वरीत अतिवृष्टीची रक्कम देण्यात यावी ही मागणी गणेश आवारी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर, गिरीश मुसळे,देविदास येरगुडे,योगेश्वर पिपंळकर, बंडू बेरड विनोद पिंपळकर, नामदेव पिंपळकर, रंगराव पवार, रामकिसन पाचभाई, देविदास येरगुडे, गणेश येरगुडे, आशिष मुसळे, विठ्ठल पिपळकर रामराव देवतळे यांचेसह नुसकानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
