Justice for Dr Sampada Munde
Justice for Dr Sampada Munde : चंद्रपूर २ नोव्हेम्बर (News३४) – महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा मा.संध्याताई सव्वालाखे यांचा निर्देश्यानुसार खासदार मा.प्रतिभाताई धानोरकर, विरोधी पक्ष नेते मा. विजयभाऊ वडेटीवार,चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा,सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनात,तसेंच शहर जिल्हाध्यक्ष मा. रामूभैय्या तिवारी यांचे प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर ग्रामीण महिला जिल्हा अध्यक्षा सौ कुंदाताई जेणेकर,शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांच्या नेतृत्वात बिड जिल्यातील फलटण येथील डॉ संपदा मुंडे यांना आत्महत्येकरिता प्रवृत्त करणाऱ्या दोन नराधमाना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी गांधी चौक चंद्रपूर येथे भव्य निषेध आंदोलन करण्यात आले. Dr Sampada Munde suicide case updates
आरोपीना तात्काळ फाशी द्या
आपल्या देशात वारंवार महिलांवर लैगिक अन्याय अत्याचार करून हत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे,आणि सरकार मात्र हत्त्यारयाला कठोर शिक्षा न करता बघ्याची भूमिका घेत अश्या घटनेमुळे महिलांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण पसरतले आहे.त्यामुळेच डॉ संपदा मुंडे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या त्या दोन्ही नराधमाना तत्काळ फाशीची शिक्षा दिली तर नक्कीच महिलांवरील अत्याचारयाच्या घटना घडणार नाही त्यामुळे त्या दोन्ही नराधमाना तत्काळ फासी झालीच पाहिजे यासाठीच चंद्रपूर जिल्हा व शहर महिला काँग्रेस रस्त्यावर उतरलो आहे. अशी प्रतिक्रिया महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेणेकर आणि महिला शहर अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांनी दिल्या. Women’s Congress protest Chandrapur
Also Read : मुद्रांक विक्रेत्याने घेतली १४० रुपयांची लाच
निषेध आंदोलनात रामूभैया तिवारी कुंदाताई जेणेकर,चंदाताई वैरागडे , जेष्ठ नेते विनोदभाऊ दत्तात्रय,अनुसूचित जाती विभाग राष्ट्रीय समन्वयक अश्विनी खोब्रागडे माजी महापौर संगीता अमृतकर माजी सभापती हर्षाताई चांदेकर,माजी नगर सेविका संगीता भोयर, सुनीता अग्रवाल, सोबतच शालिनी भगत, मीनाक्षी गुजरकर, अफसाना सैय्यद, साधना रामटेके शोभा वाघमारे, निर्मला कुळमेथे, संध्या चांदेकर, पूनम गीरसावळे, सुमित्रा कुचनकर,सुशीला रामटेके, राजेशजी अडूर,अनिलजी नरुले,नरेंद्रजी बोबडे, मनीषजी तिवारी, पिंटूभाऊ शिरवार, दुर्गेशभाऊ कोडाम, प्रशांतजी भारती,युषूप चाचा, शिरीषजी गोगुलवार पप्पूभाऊ सिद्धीकी, नौशाद शेख,नासिरजी शेख मोनू रामटेके, यांचे सह जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निषेध आंदोलनानंतर महिला कांग्रेस च्या शिस्टमंडळानी मा.पोलीस अधीक्षक चंद्रपूर याना स्व.डॉ संपदा मुंडे याना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या नराधमांवर कठोर कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले.










