MI Lifestyle Global company financial fraud । MI Lifestyle ग्लोबल कंपनीवर महिलेने लावले फसवणुकीचे आरोप!

MI Lifestyle Global company financial fraud । MI Lifestyle ग्लोबल कंपनीवर महिलेने लावले फसवणुकीचे आरोप!

MI Lifestyle Global company financial fraud

MI Lifestyle Global company financial fraud : चंद्रपूर १ नोव्हेम्बर (News34) – मागील ८ वर्षापासून एम.आय. लाईफ स्टाईल ग्लोबल कंपनी या खाजगी कंपनीत कंपनीची अभिकर्ता म्हणून काम केल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकांनी शॉपी टाकून देतो म्हणून १४ लाख ५०, हजारांची मागणी केली. पण माझ्याकडे तेवढी रक्कम नसल्याने कंपनीच्या व्यवस्थापकांनी परस्पर नातेवाईकांशी संपर्क करुन साडेचौदा लाखांची रक्कम कर्ज स्वरुपात उभी केली.

Also Read : मुद्रांक विक्रेत्याने मागितली १४० रुपयांची लाच

कंपनीवर विश्वास टाकून सदर रक्कम कंपनीत जमा केल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकांनी शॉपी न टाकता कंपनीचे काही प्रॉडक्ट विकण्यास सांगितले. परंतू एकतर मला शॉपी टाकून द्या अन्यथा माझी रक्कम परत करा अशी मागणी केली असता कंपनीच्या व्यवस्थापकांनी धमकी देत शॉपी टाकून देण्यास नकार दिला. व पैसे परत करणार नाही असेही सांगितले. काही दिवसांनी त्यांनी सदर रकमतील ५ लाख रुपये परत केले असून उर्वरित ९ लाख ५० हजार रुपये देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कंपनीने माझे ९ लाख ५० हजाराची रक्कम परत करावे अशी मागणी भद्रावती येथील शुभांगी राहूल धकाते यांनी पत्रपरिषदेत केली. Shubhangi Dhakate financial fraud complaint

प्रॉडक्टच्या विक्रीसाठी शॉपी लावण्याची ऑफर


एम.आय. लाईफ स्टाईल ग्लोबल कंपनी मागील अनेक वर्षापासून आरोग्य व खते निर्माण करणारी खाजगी कंपनी असून या कंपनीमध्ये २०१७ मध्ये भद्रावती येथील शुभांगी धकाते जुळल्या आहेत. सुरवातीच्या काळात त्यांनी कंपनीच्या प्रॉडक्टचे मार्वेâटिंग करुन आपल्या मेहनतीने चांगला व्यवसाय केला. त्यामुळे नागपूर येथील कंपनीच्या व्यवस्थापकाने शुभांगी धकाते यांनी प्रॉडक्टच्या विक्रीसाठी शॉपी लावून देण्याची ऑफर दिली. त्यासाठी १४ लाख ५० हजार रुपये कंपनीकडे जमा करावे लागेल असेही सांगितले. परंतू शुभांगी धकाते यांच्याकडे तेवढी रक्कम नसल्याने त्यांनी असमर्थता दर्शविली. परंतू या दोघांनीही शुभांगीच्या भाऊ व बहिणीला समजावून त्यांच्याकडून कर्जाऊ रुपाने सदर रकमेची व्यवस्था करुन दिली. Financial fraud allegations against MI Lifestyle

शुभांगीने सदर रक्कम कंपनीत जमा केली. तसेच यासाठी शुभांगी तीचे पती व घरच्यांचा बँकेचा तपशिल याचे कागदपत्र जमा करण्यास सांगितले. शुभांगीने ते सर्व जमा केल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकांनी शुभांगीच्या कुटूंबासोबतच काही अनोळख्या व्यक्तींचीही नावे समाविष्ट केली. तसेच पुर्ण रक्कम जमा केल्यानंतरही १४ लाख ५० हजारांचा माल देण्याऐवजी केवळ ८ लाखांचे प्रॉडक्ट देऊन शुभांगीची बोळवण केली. याबाबात विचारणा केली असता कंपनीत मालाचा तुटवडा असल्याचे कारण समोर केले. परंतू त्यानंतरही ६ लाख ५० हजारांचा माल देण्यास टाळाटाळ केली. तसेच विकलेल्या मालाचे कमिशन शुभांगीच्या आयडीवर जमा होण्याऐवजी व्यवस्थापकांच्या यांच्या आयडीवर जमा होत होते. याबाबत शुभांगी व त्यांच्या पतीने याबाबत विचारणा केली असता तुमचे नाव नविन असल्याने कमिशन जमा होण्यास वेळ लागेल असे थातूरमातूर उत्तर व्यवस्थापकांकडून देण्यात आले. Maharashtra business fraud cases


परंतू शेवटपर्यन्त अर्जदाराचे आय.डी वर कमीशनची योग्य रक्कम जमा झाली नाही. त्यांनतर शुभांगी व त्याच्या पतीच्या वारंवारच्या मागणीनंतर काही माल व्यवस्थापकाने पाठविला परतू सदर मालाची होलसेल विक्री केल्यानंतर सुध्दा योग्य कमीशन तर नाहीच परंतू महिण्याशेवटी ठरलेले २ टक्के कमीशन सुध्दा शुभांगी यांना देण्यात आले नाही. MI Lifestyle Global company financial fraud


यासंदर्भात शुभांगी व तिच्या पतीने कंपनीला माल पूरविण्याची विंनती केली असता संपलेला माल पूरविण्यास सुध्दा व्यवस्थापक मंडळाने नकार दिला ज्यामूळे अर्जदाराचे व्यापरी प्रतिष्ठानात असलेला उर्वरीत माल हा विकल्यागेला नाही. ज्यामूळे कंपनीने शुभांगीची आर्थीक फसवणुक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकांनी शुभांगीच्या पतीला नागपूरला बोलविले असता त्याला ५ लाखांचा धनादेश देऊन यानंतर पैसे मागायचे नाही अशी धमकी देऊन परत पाठविले. ते ५ लाख रुपये परत मिळाले असून कंपनीने उर्वरित ९ लाख ५० हजार रुपये परत करावे अशी मागणी शुभांगी धकाते यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून कंपनीकडे केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment