T-91 SAM-1 tiger capture Chandrapur । हल्लेखोर वाघ जेरबंद; वनविभागाची कारवाई

T-91 SAM-1 tiger capture Chandrapur

T-91 SAM-1 tiger capture Chandrapur : चंद्रपूर ८ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या ३०० पार झाल्याने ग्रामीण व शहरी भागात सहजरित्या वाघाचे दर्शन होत आहे, विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात ३८ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.अश्याच एका हल्लेखोर वाघाला वनविभागाने जेरबंद केले आहे.

Also Read : वाघाने हल्ला केला, हल्ल्याचा व्हिडीओ पुढे आला पण..

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोहर्ली वनपरिक्षेत्र (बफर) येथे मानवी वस्तीच्या परिसरात वारंवार वावर करून मानवी जीवितास धोका निर्माण करणारा नर बछडा वाघ T-91 SAM-1 यास दिनांक 07 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी अंदाजे 5 वाजता वन विभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या जेरबंद केले आहे.सदर जेरबंद केलेल्या वाघास सध्या ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

यापूर्वी, दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी मोहर्ली (बफर) परिक्षेत्रातील नियतक्षेत्रानजीक शेतकाम करत असताना श्री. अमोल बबन नन्नवारे वय -37 वर्षे रा. भामडेळी यांचा सदर वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या मानक कार्यपद्धतीनुसार गठित तांत्रिक समितीच्या शिफारशीच्या आधारे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी आदेश जारी करून, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि आणखी मनुष्यहानी होऊ नये म्हणून सदर वाघास जेरबंद करून ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्याचे निर्देश दिले होते.

Leave a Comment