Wardha river missing children । वर्धा नदीत ४ शाळकरी मुलं बुडाली; गुराख्याच्या धैर्याने दोघं वाचले पण

Wardha river missing children । वर्धा नदीत ४ शाळकरी मुलं बुडाली; गुराख्याच्या धैर्याने दोघं वाचले पण

Wardha river missing children

Wardha river missing children : वरोरा, २ नोव्हेम्बर (News३४): वरोरा शहरापासून जवळच असलेल्या वर्धा नदीच्या तुराना घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी दोन शाळकरी मुले नदीच्या खोल पाण्यात वाहून गेली आहेत. ही दुर्दैवी घटना रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. वाहून गेलेल्या मुलांमध्ये रूपेश विजेंद्र कुळसंघे (वय १३, रा. कर्मवीर वॉर्ड, वरोरा) आणि प्रणय विनोद भोयर (वय १५, रा. जिजामाता वॉर्ड, वरोरा) यांचा समावेश आहे. नदीपात्रातून दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी, वाहून गेलेल्या मुलांचा रात्री उशीरपर्यंत शोध लागला नाही.

नेमकी घटना काय?

शहरातील चार मित्र – रुपेश कुळसंघे, प्रणय भोयर, उमंग धर्मेंद्र आत्राम, आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे हे रविवारी दुपारच्या सुमारास सायकलने तुराना घाटावर पोहण्यासाठी गेले होते. चौघेही नदीच्या पात्रात उतरले. त्याच वेळी घाटाच्या दिशेने कोणीतरी महिला येत असल्याचे दिसल्याने, चौघांनीही नदीच्या पात्रात लपण्याचा प्रयत्न केला. लपण्याच्या प्रयत्नात ते नदीतील खोलगट भागात गेले आणि चौघेही बुडू लागले.

गुराख्याने वाचवले दोघांना

मुलांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू करताच, जवळच जनावरे राखत असलेल्या एका गुराख्याने तातडीने धाव घेतली. त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता उमंग आत्राम आणि कृष्णा कुईजडे या दोन मुलांना नदीतून सुखरूप बाहेर काढले.

Also Read : कांग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

मात्र, दुर्दैवाने, रूपेश आणि प्रणय हे दोन मित्र पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्याने खोल पाण्यात वाहून गेले. त्यांना वाचवण्यात गुराख्याला यश आले नाही.

शोधमोहीम थांबली, उद्या पुन्हा सुरू होणार

गुराख्याने तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी बेपत्ता असलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना माहिती दिली, ज्यामुळे कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर येथील पोलिस रेस्क्यू चमू घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी वाहून गेलेल्या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. Warora search operation river

परंतु, रात्री उशीर झाल्यामुळे आणि अंधारामुळे रेस्क्यू चमूने शोधमोहीम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, ता. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण वरोरा शहरावर शोककळा पसरली आहे.

आईचे छत्र हरवलेल्या प्रणयवर काळाचा घाला

वर्धा नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या प्रणय विनोद भोयर याचा शोध अद्याप लागलेला नाही. प्रणय केवळ अकरा महिन्यांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले होते. त्याचे वडील विनोद भोयर यांनी त्याचे एकट्याने पालनपोषण केले होते. आधी पत्नी आणि आता एकुलत्या एका मुलगा नदीत बुडल्याने वडील विनोद भोयर यांच्यावर मोठा आघात झाला असून ते एकाकी पडले आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment