chandrapur to mumbai train : जनविकास सेनेचे धिक्कार आंदोलन

chandrapur to mumbai train मुसळधार पावसात जनविकास सेनेने केले ‘धिक्कार आंदोलन’, ‘मुंबई व पुणेला नियमीत ट्रेन,मागणी नाही अधिकार आहे’ चा नारा

chandrapur to mumbai train चंद्रपूर – सिमेंट, कोळसा व लोहखनिजाच्या वाहतुकीतून दरवर्षी 3 ते 4 हजार कोटी रूपयांचा महसुल देणाऱ्या चंद्रपूर-बल्लारपूर पासुन मुंबई व पुणेला जाण्यासाठी नियमित ट्रेन असणे ही स्थानिक नागरिकांची मागणी नसून अधिकार आहे.

अवश्य वाचा : चंद्रपूर मनपाला दीड कोटीचे बक्षिस


पुणे किंवा मुंबईला शिक्षण व नोकरीसाठी जाणारे या भागातील हजारो युवक,त्यांचे आई-वडील तसेच व्यवसाया निमित्त जाणारे व्यापारी व इतर सर्वसामान्य नागरिकांना या अधिकारापासून गेली अनेक वर्षे वंचित ठेवणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी जनविकास सेनेने धो-धो पावसात आंदोलन केले.जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात बल्लारशाह रेल्वे स्टेशन समोर आज(सोमवार दि.30 सप्टेंबर रोजी) करण्यात आलेल्या या आंदोलनात बल्लारपूर शहरातील अनेक सामाजिक-राजकीय तसेच व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन समर्थन दिले. chandrapur to mumbai train


मुंबई-पुणे नियमित रेल्वे गाडी सुरू करणे तसेच रेल्वेने बंद केलल्या सेवाग्राम लिंक एक्सप्रेस, बल्लारपूर भुसावळ पॅसेंजर ट्रेन, तेलंगणातून येणाऱ्या भाग्य नगरी, रामगिरी, काजीपेठ-नागपूर पॅसेंजर ट्रेन या जनहिताच्या गाड्या पूर्ववत सुरू होईपर्यंत जनविकास सेनेचे जनआंदोलन सुरू राहील असा इशारा यावेळी देशमुख यांनी दिला. Chandrapur to pune train


आज झालेल्या धिक्कार आंदोलनात प्रामुख्याने बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष डॉ.मधुकर बावणे,व्यापारी असोसिएशनचे बल्लू गिडवाणी, नरेश मुंधडा, जगदीश मुंधडा,नवनित सारडा,रविंद्रसिंग सलुजा,रवि फुलझेले, राजु मुंधडा सराफा असोसिएशन चे दिपक कढेल,बालकिसन कढेल,मेडिकल असोसिएशनचे प्रमोद बोरकुटे,बावेजा तसेच बल्लारपूरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील राजु काबरा, बादल उराडे,प्रदिप मुरकुटे,प्रशांत मेश्राम,अंकित निवलकर,रवि बेजल्ला,रितेश तेलंग,इब्राहीम खान,राहुल रामटेके रोशन चौथरी,हरिदास विश्वास तसेच जनविकास सेना महिला आघाडीच्या मनिषा बोबडे भाग्यश्री मुधोळकर , बबिता लोडेल्लीवार,स्नेहल चौथाडे,छाया उपरे,दर्शना झाडे इत्यादी महिलांनी सहभाग घेतला.


यावेळी मुसळधार पावसात सुद्धा रेल्वे प्रशासना विरोधात संताप व्यक्त करत प्रचंड नारेबाजी करुन धिक्कार करण्यात आला. यानंतर आंदोलनकर्त्यांनी बल्लारशा रेल्वे स्टेशनचे प्रबंधक रविंद्र नंदनवार यांना निवेदन दिले. या धिक्कार आंदोलनाने समस्त बल्लारपूरकरांचे लक्ष वेधले होते. Chandrapur to pune train

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!