VBA Ballarpur बल्लारपूर – गेल्या अनेक वर्षापासून बल्लारपूर तालुक्यासह जिल्ह्यात वंचित पक्षाने जनसेवेचे निरंतर कार्य करीत पक्ष बळकट करून टाकत वाढविली असल्याने भाजप,काँग्रेस पक्षाच्या भीती निर्माण झाली असून त्यामुळेच समाजात निलंबित केलेल्या कार्यकर्त्यांना पुढे करून संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप करीत आहे.
VBA Ballarpur बल्लारपूर तालुक्यातील रमेश लिंगलपल्लीवर या कार्यकर्त्याने लोकसभेत काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार करीत असल्याचे आढळून आले.त्यानंतर त्यास पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेऊन त्यास पक्षातून निलंबित करण्यात आले असून त्याचा वंचित शी कसलाही संबंध नाही.असे वंचितचे जिल्हाध्यक्ष सोमाजी गोंडाने यांनी स्पष्ट केले आहे.
16 बुद्ध विहारात अभ्यासिका, आमदार जोरगेवार यांचा पुढाकार
रमेश लिंगलपल्लीवर याने विधानसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश केल्याचे समजते.ती वंचित सोडून भाजपात 200 कार्यकर्त्यांसह प्रवेश केल्याचे सांगत सुटला आहे. वास्तविक त्यास पक्षातून कधीचेच काढून फेकण्यात आले असल्याने त्याचा तिळमात्र संबंध वंचितशी नाही. त्याचे जाण्यामुळे पक्षाला कुठलाच परिणाम होत नसून सतत पक्ष फेरबदल करीत असल्याने त्याची किंमत कुठेही होत नसल्याने केवळ संभ्रम निर्माण करीत असल्याने त्यांचेवर वंचित भाव देत भाजपात आपली पत निरामन करण्यासाठी बेताल व्यक्तव्य करीत आहे. VBA Ballarpur
या निवडणुकीत वंचितचे सतीश मालेकर यांना उमेदवारी जाहीर केली असून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात मुसंडी मारत इतर पक्षाला घाम फोडला आहे.अशात काही उमेदवारांनी वंचितला बदनाम करण्यासाठी नतभ्रष्ट लोकांना पुढे करून मतदारात वास्तविक प्रचार करण्यासाठी पुढे करून डाव साधण्याचा प्रयत्न करीत आहे.अशांना वंचितचा कार्यकर्ता व मतदार भीक घालणार नाही. VBA Ballarpur
सुगंधित तंबाखूची रक्षा करणाऱ्या महिलेला अटक
स्वाभिमानी कार्यकर्ता कधीच आंबेडकरी विचाराशी तडजोड व प्रतारणा करणार नाही. भाजप व काँग्रेस पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीची भीती वाटत असून त्याच पक्षात फुटीचे खिंडार पडत आहे. तळागाळातील जनतेच्या समस्या व ओबीसी,एससी, आदिवासींचे आरक्षण संपविण्याचा घाट भाजप,काँग्रेस रचत असून आता हा समाज या पक्षातील उमेदवाराना नाकारण्याचा पवित्रा घेतला आहे.
न्याय,हक्क व आरक्षणाच्या लढाईत बहुजन उतरला असून येथील जातिवंत पक्षाच्या उमेदवाराच्या पायाखालची माती घसरली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात वंचित अबाधित असून बेताल कार्यकर्त्यांच्या जाण्याने वंचितला काहीही परिणाम होणार नाही हे निर्विवाद सत्य आहे.