News34
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात वाजत-गाजत सुरू करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात न्यूरॉलॉजी डॉक्टर उपलब्ध नसल्याची बाब आम आदमी पार्टीने उघडकीस आणत तो विभाग सुरू करीत तात्काळ डॉक्टरांची नेमणूक करावी अशी मागणी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांच्याकडे केली आहे.
आजही चंद्रपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये डोक्याला गंभीर मार लागलेला रुग्ण दाखल झाला तर त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात येते, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, अनेक मोठे उद्योग जिल्ह्यात आहे.
त्यामुळे अपघातांचे मोठे प्रमाण जिल्ह्यात दिसून येते मात्र रुग्णाला ज्यावेळी उपचाराची गरज असते त्यावेळी त्याला वेळेवर उपचार मिळत नाही, त्यामुळे रुग्ण अनेकदा दगावल्या जातो. जर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये आरोग्याच्या पूर्ण सुविधा प्रशासन व शासन उपलब्ध करू शकले नाही तर इतक्या मोठ्या वास्तूचा उपयोग काय? असा प्रश्न सुनीता पाटील यांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे कुणाचेही लक्ष नाही, चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षी मोठे अपघात घडले, मात्र उपचाराअभावी अनेक जण दगावले सुद्धा कारण जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये तशी सुविधा उपलब्ध नाही, उपचाराच्या सुविधा पाहिजे असल्यास रुग्णांना नागपूर रेफर करावे लागते.
या महत्वाच्या प्रश्नावर आम आदमी पक्षाच्या महिला अध्यक्ष एड. सुनीता पाटील यांनी अधिष्ठाता यांचे लक्ष वेधत लवकरात लवकर न्यूरॉलॉजी विभाग सुरू करीत त्या मध्ये विशेषज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी असे निवेदन दिले.
यावेळी महिला उपाध्यक्ष जास्मिन शेख, महिला उपाध्यक्ष रूपाताई काटकर, तसेच महिला पदाधिकारी, सुहास रामटेके, संतोष यादव, तब्बसुम शेख, पुष्पाताई बुधवारे, विद्या मोहुरले, ज्योती तोडासे हे उपस्थित होते.