Ballarpur railway station : त्या घटनेची पुनरावृत्ती टाळा – डॉ.अभिलाषा गावतुरे

Ballarpur railway station बल्लारपूर : आज बल्लारशा रेल्वेस्थानकावर भूमिपुत्र ब्रिगेडच्या वतीने डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते व रेल्वे प्रबंधकांना भेटले आणि रेल्वे स्थानकावर असलेल्या सर्व असुविधेबद्दल सांगितले. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अस्वच्छता. रेल्वे स्थानकावर कचरा असतो, स्टेशनवरील बाथरूम मध्ये मोठया प्रमाणात अस्वच्छता आहेत.

 

डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी बल्लारपूर रेल्वे स्टेशनवरील सुविधांची तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. बल्लारपूर रेल्वे स्टेशन एक महत्त्वाचे जंक्शन असल्यामुळे, शहराला लागून असलेल्या अनेक शहरातील लोक प्रवासासाठी येथे येतात. येणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून हे निवेदन देण्यात आले.

अवश्य वाचा : स्मार्ट वीज मीटर योजना तात्पुरती रद्द, चंद्रपुरात सुरू झाली श्रेयवादाची लढाई

Ballarpur railway station बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर पावसाळ्यात स्वच्छतेची नीट व्यवस्था नसल्यामुळे प्लॅटफॉर्म आणि प्लॅटफॉर्म लाईनमध्ये कचरा राहतो आणि नाल्यांवरून दूषित पाणी वाहते, ज्यामुळे प्रवाशांना असुविधा होते. रोज स्वच्छता नीट करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

मुख्य मागण्या
प्रवासासाठी अधिक ट्रेनची उपलब्धता
बल्लारपूर शहर आणि आसपासचे अनेक लोक तेलंगणात आंध्र प्रदेशमध्ये जाण्यासाठी या स्टेशनचा वापर करतात. परंतु, अधिक ट्रेन न मिळाल्यामुळे प्रवास करताना त्रास होतो. तेलंगणातून येणाऱ्या पॅसेंजर ट्रेनचे वेळापत्रक सुधारून शिरपूर, कागजनगर येथे 12:30 येते ,मात्र बल्लारपूर स्टेशनवर 15:30 वाजता येते. जेंव्हा की एक तासात पोहचायला हवी.

भाग्यनगर-नागपूर-काजीपेट ट्रेन सेवा पुन्हा सुरू करावी या ट्रेन सेवेची मागणी केली .

जनरल बोगी वाढवावी
सर्व सुपरफास्ट आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये फक्त पुढे एक आणि मागे एक जनरल बोगी असते. त्यामुळे प्रवाशांना गर्दीमुळे अपघात होण्याची शक्यता असते. सर्व ट्रेनच्या पुढे दोन आणि मागे दोन किंवा त्यापेक्षा अधिक जनरल बोगी वाढवण्यात याव्यात.

 

प्लॅटफॉर्म शेड आणि पुलाचे काम पूर्ण करावे
प्लॅटफॉर्मवर चालू असलेले शेडचे काम आणि प्लॅटफॉर्म 1 वरील पुलाचे काम लवकर पूर्ण करावे. प्रतीक्षा जागा लहान असल्यामुळे प्रतीक्षा आणि पार्किंगच्या जागेची व्यवस्था करण्यात यावी.

 

दुर्घटना टाळण्यासाठी दुरुस्तीचे काम
27 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या पुलाच्या दुर्घटनेप्रमाणे घटना पुन्हा होऊ नये, म्हणून दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करावे.

तिकीट काउंटरवरील सुटे पैसे

तिकीट काउंटरवर सुटे पैसे नसल्यामुळे तिकीटासाठी अधिक पैसे जातात. यावर तातडीने कारवाई करावी.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अवश्य वाचा : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी

Ballarpur railway station यावेळी रोजीना शेख, लता नागोसे ,वैशाली भुरसे, आयशा मालाधारी ,सोनी झीगारे ,प्रीती मोहूर्ले, गायत्री गावतुरे, लता नागोसे ,करुणा शेगावकर ,रामा चित्तलवार, ताहेर हुसैन ,अतीक शेख, बशीर खान ,आफताब पठान, साजिद शेख, मोइनुद्दीन, गौस शेख, अजय शाह, सिराज भाई, श्रीकांत, मुशर्रफ भाई, शिव शंकर राजभर यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!