Irregular power supply : अनियमित वीज पुरवठ्यामुळे पाणी पुरवठा ठप्प

गुरू गुरनुले

Irregular power supply मूल – सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हाची तीव्रता देखील अधिक जाणवत आहे. चीड चीड व घाम गळणारी उष्ण दाहकता निर्माण झाली आहे. अशाही परिस्थितीत विद्युत वितरण प्रणाली मात्र या ना त्या कारणाने नियमित दिवस असो वा रात्र रोजच एकसारखी विद्युत लाऊन बंद होत असल्याच्या तक्रारी सर्व सामान्य नागरिकांकडून ऐकायला येत आहेत.

अवश्य वाचा : पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना आमिष दिले तर कारवाई अटळ – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

एकंदरीत हा रोजचा धंदाच झाला आहे. मुल नगरातील व पूर्ण मुल तालुक्यातील खेडे गावात सुद्धा पहिल्याच पावसात रोजच नियमित विद्युत पुरवठा बंद होत आहे. यामुळे ग्रामीण व शहरी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच शहरी व ग्रामीण भागातील खेडे गावातील पाणीपुरवठ्या यंत्रणेवर सुद्धा याचा परिणाम झाला. परंतु तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याचे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वारंवार वीज सेवा खंडीत होत असल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम पडल्याचे सांगून नगर पालिकेच्या प्रशासन अधिकारी देखील पांघरून घालत आहेत.

मूल शहरासह तालुक्यात काही ठिकाणी शुक्रवारी तुरळक स्वरूपाचा पाऊस असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आणि पाणीपुरवठा यंत्रणेवरही परिणाम होऊन पावसाळ्यात तांत्रिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे दिसून येत आहे.
मुल नगरातील वादळी हवेमुळे झाडाच्या फांद्या पडणे, वीज कडकडणे यासह वेळेवर येणारी अनेक कारणे यासाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो.

पंकज उजवणे, सहायक अभियंता, महावितरण, मूल

Irregular power supply पावसाळा सुरु झाला असला तरी मात्र पाहिजे त्या प्रमाणात मृग नक्षत्र पूर्ण होण्याची वेळ आली मात्र मृगनक्षत्रानंतरचा मेघ गर्जनेसह पाऊस थोड्या प्रमाणात कोसळला. पावसाच्या आगमनाने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शेतकऱ्यांनी शेतीच्या हंगामाला सुरुवात केली. पण दुसरीकडे प्रचंड चिक्कट उकाड्यालासुद्धा त्यांना सामोरे जावे लागत आहे. खऱ्या मान्सुनचा पाऊस कधी बरसेल याची नागरिकांना उत्सुकता अजूनही कायम आहे.

महत्त्वाचे : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते अनेकांनी केला कांग्रेस पक्षात प्रवेश

काही प्रमाणात पावसाला सुरवात झाली. रात्रीही पावसाचे थेंब पडले. परंतु उष्णता काही कमी झालेली नाही. पहिल्याच पावसाने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पावसामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. दिवसा ऊन आणि दुपारी पाऊस यामुळे गर्मी आणि उकाड्यात भर घातल्या गेली होती. अशातच वीज सेवा खंडीत झाल्याने नागरिकांना त्रास होत आहे. तसेचपाणीपुरवठ्यावरसुद्धा परिणाम झाला.

विद्युत पुरवठा सारखा बंद असल्यामुळे हरणघाट येथून पाणीपुरवठा सुरू होवू शकला नाही. त्यामुळे शहरातील चारही पाण्याच्या टाकीत ठणठणाट निर्माण झाला. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शनिवारी खंडीत होत असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. बेंबाळ येथील वीज केंद्रातून हरणघाट पाणीपुरवठा येथे सरळ विदयुत सेवा देण्यात आली आहे. पावसामुळे झाड पडल्याने विदयुत सेवा खंडीत झाली. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला.- विनोद येनुरकर, पाणीपुरवठा अधिकारी यांनी सांगितले.

Irregular power supply एकंदरीत पाणीपुरवठा संबंधी व्हॉटसअॅप ग्रुपवरून नागरिकांना सूचना द्यावी लागली. पहिल्याच पावसात अनेक वेळा विद्युत पुरवठा बंद होत असल्याने व त्याच कारणाने पाणीपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांनी व्हॉटसअॅप ग्रुपवर प्रशासनाविषयी रोषही व्यक्त केला जात आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!