chandrapur rain : पूरपरिस्थिती, चंद्रपूरातील हा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद

chandrapur rain चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात परत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 29 जुलैला पुराचे पाणी पुलावरून गेल्यामुळे भोयेगाव – चंद्रपूरमार्ग तिसऱ्यांदा बंद झाला आहे. वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात युवकांचा जीवघेणा स्टंट

कोरपना, राजुरा, गोंडपिपरी या तालुक्यातील शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होत असून पिकांची वाढ खुंटली आहे व पिके पिवळी पडून खराब होत असल्याचे चित्र आहे. अनुचित घटना घडू नये यासाठी भोयेगाव-चंद्रपूर मार्गावर गडचांदूर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!