Cotpa Act : कोटपा कायद्यात अडकले चंद्रपुरातील शासकीय कर्मचारी

cotpa act राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर तर्फे जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील वेगवेगळ्या विभागात तंबाखुचे सेवन करणारे कर्मचारी तसेच नागरिक अशा 17 जणांवर कोटपा कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून 2700 रुपयांचा दंडसुध्दा वसूल करण्यात आला.

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणी होणार पायलट

Cotpa act सदर कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील वेगवेगळ्या विभागात कोटपा कायदा कलम चार अंतर्गत 17 लोकांवर 2700 रुपयांची कारवाई करण्यात आली. यात आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाटबंधारे विभाग, उमेद कार्यालय, बांधकाम विभाग, सीडीसीसी बँक, पाणी व स्वच्छता विभाग, समाज कल्याण विभाग, वित्त विभागातील कर्मचारी व नागरिकांचा समावेश होता. यावेळी तंबाखूमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबत कार्यालयात मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.

सदर कारवाई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा सल्लागार डॉ.श्वेता सावलीकर, समुपदेशक मित्रानजय निरांजने, सामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरे, मल्टीटास्क वर्कर शंकर संगमवार अतुल शेंद्रे, सुरज बनकर त्यांच्यामार्फत करण्यात आली.

कोटपा कायदा म्हणजे काय?


सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम २००३ हा केंद्राचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. तसेच बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्यास १ लाख रुपये आणि ७ वर्ष शिक्षेची तरतूद आहे. बाल न्याय कायद्यानुसार कारवाई करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!