Ramala Lake Pollution । मनपा आयुक्त अकनूरी नरेश यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल - राजेश बेले

April 28, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - चंद्रपुरातील ऐतिहासिक Ramala Lake Pollution प्रदूषित झाले असून अद्यापही मनपाने यावर पाऊले उचलली नाहीत त्यामुळे संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी चंद्रपूर मनपा आयुक्त अकनूरी नरेश यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर अंतर्गत दिनांक 25/04/2026 रोजी शनिवारच्या दिवशी ऐतिहासिक गोंडकालीन प्रसिध्द रामाळा तलाव यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे, राजेश बेले संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था यांनी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार केली आहे. तसेच तलावातील पाणी अत्यंत दूषीत झाले असून त्यामध्ये मोठया प्रमाणात मासे मृत्य अवस्थेत आढलेले आहेत. तसेच तलावातील इतर लहान जीवसृष्टी देखील मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गधीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

 

 त्यामुळे पर्यावरण प्रदूषण वाढले असुन त्याचा परिणाम मानव, पशु, पक्षी व इतर सजीवाच्या जीवाला व आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. दिनांक 27/04/2026 रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता तलावाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनास आले. तलावातून तिव्र दूर्गधी पसरलेली असून परिसरातील नागरिकांना त्याचा 'त्रास होत आहे. मा. आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यानी अदयापही कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे परिस्थीती अधिकच बिकट होत आहे.

 

तलावाचे जतन व स्वच्छताकरणे ही चंद्रपूर शहर महानगरपालिकाची जबाबदारी असून त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण झालेला आहे म्हणून मा. आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तत्काळ तलाव स्वच्छ व उपाययोजना करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते Rajesh Bele संस्थापक अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था चंद्रपूर यांनी शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे. (हे हि वाचा - कपडे धुताना बाप-लेक व भाची बुडाली)

Leave a Comment

+