Wardha River Drowning : चंद्रपूर - चंद्रपूर तालुक्यातील धानोरा गावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघेजण वर्धा नदीत बुडाल्याची घटना समोर आली आहे.यामध्ये राजू कोडापे (वय 40), अर्पिता कोडापे (वय 12) आणि प्रियांका मडावी (वय 14) यांचा समावेश आहे. (२ दिवसापासून बेपत्ता महिलेचा विहिरीत आढळला मृतदेह)
बहिणीच्या घरी कार्यक्रम असल्याने भाऊ राजू कोडापे राहणार खामोना राजुरा हे आपले कुटुंब घेऊन धानोरा गावात पोहोचले होते, कार्य्रक्रम आटोपल्यावर कपडे धुण्यासाठी महिला, पुरुष सह राजू कोडापे आपली मुलगी व भाची सोबत वर्धा नदीकाठी गेले होते, यावेळी अचानक मुलगी व भाची नदीच्या खोल पाण्यात जाऊ लागल्याने राजू कोडापे यांनी नदीत उडी घेतली, तिघे हि बुडत असताना एकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्या तिघांना ते बुडण्यापासून वाचवू शकले नाही. गावातील नागरिकांनी याबाबत घुग्गुस पोलिसांना माहिती दिली असता पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी बचाव दलाला पाचारण करीत शोध मोहिमेला सुरुवात केली, सायंकाळ झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. या घटनेमुळे धानोरा गावात शोककळा पसरली आहे.
Leave a Comment