Tuesday, May 21, 2024
Home Blog

12th hsc result 2024 : निकाल बघितल्यावर त्याने उचललं टोकाचं पाऊल

0

12th hsc result 2024 आज संपुर्ण राज्यात 12 वी चे निकाल जाहीर झाला असून सर्वच विद्यार्थी निकाल पाहून यश प्राप्त केल्यानंतर आनंद साजरा करीत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात नेरी येथे आज मंगळवारी दुःखद दुर्दैवी घटना समोर आली आहे.

अवश्य वाचा : चंद्रपुरात जाहिरातीचे 40 अनधिकृत फलक

एका विद्यार्थ्यांने बारावीत नापास झाल्याने नैराश्यात येऊन त्याने घरीच गळफास घेवून जीवनयात्रा संपविली आहे. आकाश पुरुषोत्तम वैरागडे (वय 18) रा. नेरी (चिमूर) असे मृतकाचे नाव आहे. नेरी गावात शोककळा पसरली आहे.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील 200 बिअर बार नियमबाह्य

12th hsc result 2024 चिमूर तालुक्यातील नेरी येथील आकाश पुरुषोत्तम वैरागडे हा विद्यार्थी चिमूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता.  बारावीची परीक्षा झाली आणि पेपरसुद्धा चांगले गेले असल्याने परीक्षेत चांगल्या गुणांनी यश संपादन करिन असा त्याचा आत्मविश्वास होता. आज मंगळवारी मात्र निकाल लागताच ऑनलाइन निकाल पाहताच त्याला धक्का बसला.

महत्वाची बातमी : घरबसल्या काढा विवाह नोंदणी प्रमाणपत्र

अभ्यास व मेहनत करूनही त्याला इंग्रजी व इतिहास या विषयात कमी गुण मिळाल्याने तो नापास झाला त्यामुळे तो नैराश्यात गेला. त्याने जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेत घरात कुणीही नसतांना दरवाजा बंद करून  दोराने दुपारी 2 वाजताच्या सुमारास  गळफास घेऊन आत्महत्या केली.  ही घटना सायंकाळी उघडकीस आली.
12th hsc result 2024 सदर घटनेची माहिती बाहेरून सायंकाळी 6 वाजता दरम्यान  घरी परत आलेल्या भावाला माहित झाली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्याने आवाज देऊनही आतून प्रतिसाद न आल्याने  दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी भावाला धक्का बसला. मृत्तदेह घराला लटकलेल्या अवस्थेत आधळून आला. शेतात कामाला गेलेले आई वडील घरी पोहचले. त्यांनाही धक्का बसला. मृत्यूची वार्ता गावात पसरताच आकाशला बघण्यासाठी  घरासमोर गर्दी झाली.

 

सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी तपास सूरू केला आहे. परंतू आकाशने आज घोषीत झालेल्या बारावीच्या परीक्षेत दोन विषयात नापास झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे कारण समोर येत आहे. नेरी गावावर शोककळा पसरली.

Remove Unauthorized advertisement boards : चंद्रपुरात 40 अनधिकृत जाहिरात फलक

0
Chandrapur city

Remove Unauthorized advertisement boards चंद्रपूर महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात फलक निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली असून तीनही झोन मिळुन एकूण १३ जाहीरात फलकांवर निष्कासनाची कारवाई आली आहे. तसेच पुढील दिवसांत शहरातील उर्वरित अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे.

अवश्य वाचा : तर चंद्रपूर जिल्ह्यातील 200 बिअर बार बंद होणार

Remove Unauthorized advertisement boards महापालिका आयुक्तांनी मुंबई दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बैठक घेत शहरातील धोकादायक जाहिरात फलकांची तपासणी करून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार शहरातील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण सुरू असुन या सर्वेक्षणामध्ये १२४ अधिकृत तर ४० अनधिकृत जाहिरात फलक आढळुन आले आहेत. यात झोन क्र.१ अंतर्गत २०, झोन क्र.२ अंतर्गत १३ तर झोन क्र.३ अंतर्गत ७ अनधिकृत फलक आहेत.

महत्वाची बातमी :मान्सूनचे यंदा लवकर होणार आगमन

Remove Unauthorized advertisement boards या सर्व अनधिकृत फलकांना जाहीरात फलकांचे संरचना मजबुती प्रमाणपत्र ( Structural stability certificate ) विमा पॉलिसी, फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट व इतर आवश्यक दस्तावेज सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आढळलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांपैकी झोन क्र.१ अंतर्गत ८ जाहिरात फलक,झोन क्र.२ अंतर्गत ४ जाहिरात फलक तर झोन क्र.३ अंतर्गत १ असे एकुण १३ जाहिरात फलक काढण्यात आले असुन इतर काढण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे पेट्रोलपंप आवारातील होर्डींग धारकांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत.रेल्वे प्रशासनाच्या परिसरात असलेल्या जाहिरात फलकांच्या स्थितीबाबत मनपाला रेल्वे प्रशासनाने अद्याप अवगत केलेले नाही. मान्सुनपूर्व व अन्य कालावधीत होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यास रेल्वे प्रशासन परिसरातील जाहिरात फलक काढण्यास रेल्वे प्रशासनास कळविण्यात आलेले आहे.

Sudhir bhau mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांनी केला सुवर्णपदक विजेते योगपटूंचा सत्कार

0
Sudhir bhau mungantiwar

Sudhir bhau mungantiwar बँकॉक (थायलंड) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत १३ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकांवर नाव कोरणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील योगपटूंचा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार झाला. योगसाधनेसारखे ईश्वरीय कार्य तरुण पिढी करीत असल्याबद्दल त्यांनी अभिमान देखील व्यक्त केला.

अवश्य वाचा : 12 वि चा निकाल बघा या संकेतस्थळावर

Sudhir bhau mungantiwar योगासनांच्या प्रचार-प्रसारासाठी कार्य करणाऱ्या महिला पतंजली योग समिती चंद्रपूरच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आलोक साधनकर, डॉ. मंगेश गुलवाडे, स्मिता रेबनकर, तानाजी बायस्कर, स्वप्नील पोहनकर, अनिकेत ठक यांची प्रमुख उपस्थिती होती.

अवश्य सविस्तर वाचा : तर चंद्रपूर जिल्ह्यातील 200 बिअर बार बंद होणार, मनोज पाल यांचा दावा

Sudhir bhau mungantiwar बँकॉक येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वरोरा येथील एसए योगा इन्स्टिट्यूटच्या ८ योगपटूंनी ट्रॅडिशनल, रिदमीक सिंगल योगा, रिदमीक पेअर योगा आणि आर्टिस्टिक पेअर योगा या ३ योग प्रकारांमध्ये ऐकूण १३ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके पटकावली. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या १३ देशांमधील १२७ योगपटूंमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करणे अभिमानास्पद असल्याची भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

बातमी हवामानाची : राज्यात या दिवशी होणार मान्सून चे आगमन

ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘हजारो वर्षांपूर्वीपासून शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगसाधना केली जाते,देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी याच योगसाधनेला जागतिक स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त करून दिले. २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून १७५ देश योगसाधनेशी जोडले गेले. आज लंडनमध्ये १ तास योगा शिकविण्यासाठी ५० ते १०० पाऊंड म्हणजे ५ ते १० हजार रुपये योगशिक्षकांना दिले जातात. यावरून आपल्याला योगासनांचे महत्त्व लक्षात येईल.

 

Sudhir bhau mungantiwar मनाचे समाधान धनामध्ये नाही तर योगामध्ये आहे, हे सिद्ध झाले आहे आणि जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील योगपटूंनी योगसाधनेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली कामगिरी गौरवास्पद ठरते.’ चांगले काम केल्यानंतर होणारा गुणगौरव प्रेरणादायी असतो. महिला पतंजली योग समितीने योग कार्याचा विस्तार करावा. मी सदैव तुमच्यासोबत आहे, असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिला.

आंतरराष्ट्रीय योगपटूंचे कौतुक
बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत पदकांची कमाई करणारे खेळाडू व एसए योगा इन्स्टिट्यूटचे संस्थापक अनिकेत ठक व स्वप्नील पोहनकर यांचे कौतुक व अभिनंदन केले. हे खेळाडू गेल्या ४ वर्षांपासून नित्यनेमाने सराव करीत आहेत. यामध्ये सई नेवास्कर-१ सुवर्ण व १ रौप्य, स्वर्णिका नौकरकर – २ सुवर्ण, शर्वरी मिटकर – २ सुवर्ण, गायत्री पाल- १ सुवर्ण व १ रौप्य, शौनक आमटे- २ सुवर्ण, साहिल खापणे- २ सुवर्ण, श्रीकांत घानवडे- १ सुवर्ण व १ रौप्य, राम झाडे – २ सुवर्ण या योगपटूंचा समावेश आहे.

Maharashtra state 12th result : आज 12वी चा निकाल

0
Maharashtra state board

Maharashtra state 12th result
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या २१ मे रोजी दुपारी जाहीर करण्यात येणार असून दुपारी एक वाजता निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील नियमबाह्य 200 बिअर बार बंद होणार

बारावीचा निकाल ऑनलाईन कसा पाहाल?

बारावीचा निकाल ऑनलाइन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना mahresult.nic.in किंवा https://hscresult.mkcl.org या वेबसाइटवर जावे.
वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर बारावी निकालावर क्लिक करावे.
त्यानंतर तिथे असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाकावा लागेल.

 

Maharashtra state 12th result तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं (उदा. आईचं नाव SONALI असेल तर तुम्हाला SON लिहावं लागेल)
सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

बारावीच्या निकालाची तुम्ही प्रिंट आऊट घेऊ शकता. याशिवाय तो मोबाइलमध्ये देखील सेव्ह करू शकता.

 

Join Aam Aadmi Party : आम आदमी पक्षात अनेकांचा पक्षप्रवेश

0
Join aap

Join Aam Aadmi Party बल्लारपूर तालुक्यातील शासकीय विश्रामगृहात आम आदमी पार्टीच्या मोठ्या पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्याकडून करण्यात आले. जिल्हा समिती सदस्य परमजीत सिंग झगडे, विधी सल्लागार ऍड.किशोर पुसलवार, बलराम केसकर आणि विशाल माने यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील 200 बिअर बार बंद करणार

Join Aam Aadmi Party यावेळी जिल्हा सचिव राज नगराळे, जिल्हा संघटन मंत्री शंकर अरोरा, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना दीपक भाऊ बेरशेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. बल्लारपूरमध्ये आम आदमी पार्टीचा मजबूत पक्षप्रवेश झाल्याचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले.

अवश्य वाचा : घरबसल्या काढा विवाह नोंदणी प्रमाणपत्र

Join Aam Aadmi Party कार्यक्रमाच्या वेळी आम आदमी पार्टीची संघटना बांधणी व पक्ष प्रसाराविषयी जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी मार्गदर्शन केले. आगामी काळात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व गाव पातळीवर आम आदमी पार्टीची संघटना मजबूत करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

 

Join Aam Aadmi Party चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टीची मजबूत संघटना उभी राहिली असून, लोकहिताच्या विविध मुद्द्यांवर ही संघटना कार्यरत आहे. दिल्ली येथील आम आदमी पार्टी सरकारच्या धर्तीवरच लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणाऱ्या धोरणांना प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी आम आदमी पार्टी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.

 

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जिल्हा समितीचे निलेश जाधव, शमशेर सिंग चव्हाण, विशाल माने यांच्या सह दीपक वाडके, नागेंद्र शर्मा, दिनेश जयस्वाल, आशिष गेडाम, सुमित ताकसांडे, शंकर अडवाणी, नवी पठाण, इरशाद शेख, अंकुश सुरतीकर, लव सुरवतीकर, देवा फुलकर, सोनू सय्यद, कालिदास जुनगरे, फिरोज शेख, अहमद शेख, आतिश वैरागडे, इमरान खान, संजय वर्मा, हेमंत ठाकरे, नाना माडमवार, अजय शिवाचे, बंडू मेश्राम, संजय ठाकरे, अर्जुन झांजोटे, सुमित झांजवटे, दत्ता घोणे, दिनेश आसटकर, सुरेश नाडमवार उपस्थित होते.

Chandrapur News : तर चंद्रपूर जिल्ह्यातील 200 बिअर बार बंद होणार – भाजप नेते मनोज पाल

0
Press conference

Chandrapur news चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविल्यावर जिल्ह्यात तब्बल 400 नव्या बिअर बार ला परवानगी देण्यात आली होती.

अवश्य वाचा : आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांना दाखविला मराठी चित्रपट जुनं फर्निचर

मात्र या बार ला परवानगी देताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले, हे सर्व कारस्थान उत्पादन शुल्क चंद्रपूरचे अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात झाले असा आरोप भाजप नेते मनोज पाल यांनी 20 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

अवश्य वाचा : यादिवशी जाहीर होणार महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डाचा निकाल

Chandrapur news वर्ष 2015 मध्ये चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित करण्यात आला होता, त्यावेळी राज्यात भाजपची सरकार होती, दारूबंदी नंतर 7 वर्षांनी महाविकास आघाडी सरकारने हटविली, त्यावेळी जिल्ह्यात एकूण 350 बिअर बार होते.

 

Chandrapur news त्यानंतर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात नियमबाह्य पध्दतीने 400 बिअर बार ची परवानगी देण्यात आली, यामध्ये अनेक बिअर बार धारकाकडे नियमानुसार कागदपत्रे नाहीत, संजय पाटील यांनी अर्थकारण करीत नियमांना धाब्यावर बसविले व नव्या बार ला परवानगी देण्यात आली.

अवश्य वाचा : एका क्लिक वर निघणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र

Chandrapur news विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील व इतर दोन अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.

भाजप नेते मनोज पाल यांनी जिल्ह्यातील सर्व बार, देशी भट्टी व वाइन शॉप बाबत माहिती अधिकारात माहिती मागितली असून त्यांनतर नियमबाह्य दारू दुकानांबाबत मी स्वतः प्रशासनाकडे तक्रार करणार, प्रशासनाने कारवाई केली तर जिल्ह्यातील 200 बिअर बार नक्कीच बंद होणार. यासाठी माझी लढाई ही सुरू राहणार अशी प्रतिक्रिया पाल यांनी यावेळी दिली.
आयोजित पत्रकार परिषदेत भाजपच्या डॉ.भारती दुधानी, उज्वला नलगे यांची उपस्थिती होती.

Marriage Certificate online registration : घरबसल्या एका क्लिकवर निघणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र

0
Online registration

Marriage Certificate online registration आज तंत्रज्ञानाच्या युगात कुठलेही कागदपत्रे सहज उपलब्ध काढता येते, अशीच एक ऑनलाइन प्रक्रिया आम्ही आज तुम्हाला सांगणार आहो.

अवश्य वाचा : या दिवशी जाहीर होणार वर्ग 10 व 12 वीचा निकाल

लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुला-मुलीचे आयुष्य पूर्णपणे बदलते. लग्न झाल्यानंतर नावापासून ते इतर महत्त्वाच्या कागदपत्रांवर अनेक गोष्टी बदलतात. त्यातील महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे विवाह प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र बनवण्याचे इतर अनेक फायदे देखील आहेत. पण हे बनवण्याचे कसे? यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे? ऑनलाइन प्रोसेस काय? जाणून घ्या सविस्तर..

अवश्य वाचा : rte अंतर्गत अर्ज भरण्यास सुरुवात, 31 मे शेवटची तारीख

आवश्यक कागदपत्रे

Marriage Certificate online registration● वधु आणि वर यांच्या वयाचा पुरावा
• टी. सी. ( शाळा सोडल्याचा दाखला )
जन्माचा दाखला
• १० वी / १२ वी चे प्रमाणपत्र ( सनद )
• वाहन परवाना
• पासपोर्ट इत्यादी पैकी कोणतेही एक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
● वधू आणि वर यांचे पासपोर्ट साईज फोटो – दिनांकासह
● वधु व वर यांचा विवाह प्रसंगाचा फोटो
● तीन साक्षीदार, तिन्हीही साक्षीदारांचे पासपोर्ट साईज फोटो – दिनांकासह
● वर, वधू आणि साक्षीदार यांचा विवाह पूर्वीचा राहण्याचा पुरावा – (कोणतेही एक सांक्षाकीत झेरॉक्स )

● आधार कार्ड
● मतदान ओळखपत्र
● लाईट बिल / फोन बिल
● शासकीय ओळखपत्र
● वाहन परवाना
● पासपोर्ट
● राशन कार्ड
● डॉमेसाईल प्रमाणपत्र इत्यादी पैकी कोणतेही एकाचे झेरॉक्स
● मूळ लग्नपत्रिका (नसेल तर विहित नमुन्यात १०० /- रु. च्या नोटराईज बॉंड पेपर वर शपथपत्र)
● विवाहची नोंदणी या पूर्वी कुठेही झालेली नसल्याबाबत विहित नमुन्यात १०० /- रु. च्या नोटराईज बॉंड पेपर वर शपथपत्र.
● अर्जासह जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळप्रत
● वधू आणि वर दोन्ही च स्पेसिफिक फॉरमॅट मध्ये अफिडेवीट्स
● वर व वधू विधवा / विधुर असतील तर अश्या प्रकरणात जोडीदार चे मृत्यू प्रमाणपत्र.
● १०० ते २०० रुपये फी

अवश्य वाचा : पोलीस भरती मध्ये शासनाची नवी अट, त्रासदायक

Marriage Certificate online registration असा करा ऑनलाईन अर्ज

● यासाठी तुम्हाला https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या साइटला भेट देऊन साइन अप करुन पुढील प्रोसेस फॉलो करावी लागेल.
● पुढच्या वेब पेजवरती तुम्ही तुमचा जिल्हा,तुमचा तालुका आणि तुमची ग्रामपंचायत निवडा.यानंतर तुम्ही पतीचे पूर्ण नाव टाका, नंतर तुमचे लग्न कोठे झाले आणि कोणत्या तारखेला झाले याची अचूक माहिती भरा.
● यानंतर तुम्ही पतीचा आधार कार्ड नंबर अचूक टाका. यानंतर तुम्ही पत्नीचे पूर्ण नाव आणि पत्नीचा आधार कार्ड नंबर टाका.

 

 

Marriage Certificate online registration वरील योग्य माहिती भरल्यानंतर तुम्ही सबमिट(Submit) पर्यायवरती क्लिक करा.
● यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक भेटेल.
पुढच्या वेब पेज वरती तुम्हाला पर्सनल माहिती संबंधी डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात.
● इथे तुम्हाला दिलेल्या संबंधित माहिती प्रमाणे पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करावा लागतो.
● या अपलोड केलेल्या पासपोर्ट साईझ फोटोची साईझ ५kb ते २०kb च्या दरम्यान असावी. (२०kb च्या वरील पासपोर्ट साईझ फोटो लग्न प्रमाणपत्र अर्जासाठी ग्राह्य धरला जात नाही आणि तुम्हाला पुढचे पेज ओपन करता येत नाही.)

 

● तुम्ही नवरी मुलगी आणि नवरा मुलगा दोघांचे पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करा.
● पासपोर्ट साईझ फोटो अपलोड केल्यानंतर तुम्ही अपलोड डॉक्युमेंट वर क्लिक करा.
● त्यानंतर तुम्ही पेमेंटच्या पेज वर गेलात की जेवढी फी विवाह प्रमाणपत्र काढण्यासाठी लागते तेवढी फी तुम्ही यु.पी.आई, ATM किंवा नेट बँकिंगवरून भरू शकता.
● पेमेंट केल्यानंतर तुम्ही दोन -पाच दिवसांनी APLE SARKAR पोर्टल वरती भेट द्या. तुम्ही जर योग्य अर्ज भरला असेल तर तुम्हाला वेब पेजवर विवाह प्रमाणपत्र दिसेल. तिथून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.
● डाऊनलोड केलेल्या फाईलची तुम्ही कलर प्रिंट काढा.

Mahesh Manjrekar New Movie : नागरिकांनी बघितलं जुनं फर्निचर

0
Marathi movie Jun furniture

Mahesh Manjrekar New Movie पुस्तकातून जे ज्ञान कमी मिळत ते अनुभवातून एकदातरी मिळतेच, आजच्या सामाजिक जीवनात प्रत्यक्ष अनुभव व काही सामाजिक चित्रपटातून हा संदेश नागरिकांमध्ये काही बदल घडविण्याचे काम नक्की करतोच.

अवश्य वाचा : ओबीसींच्या अधिवेशनात हा होणार ठराव

असाच एक समाजात बदल घडविण्याचे काम अभिनेता महेश मांजरेकर यांच्या जुनं फर्निचर या चित्रपटातून होताना दिसत आहे.

 

Mahesh Manjrekar New Movie चंद्रपूर चे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी वृद्ध नागरिक, त्यांनतर पालक व मुलांसाठी मराठी चित्रपट जुनं फर्निचर चा विशेष शो आयोजित करीत आई-वडिलांबद्दल मुलांचं मत बदलावं याचा प्रयत्न करीत आहे.

अवश्य वाचा : भानुसखिंडी च्या बछड्याला वनविभागाने पकडले

Mahesh Manjrekar New Movie 19 मे रोजी शहरातील अडलॅब्स चित्रपटगृहात आई-वडील व मुलांसाठी विशेष शो चे आयोजन आमदार जोरगेवार यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.

माहिती महत्वाची : घरीबसून एका क्लिकवर निघणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र, या स्टेप्स करा फॉलो

चित्रपट बघितल्यावर महिलांनी याबाबत महत्वाच्या प्रतिक्रिया दिल्या, सदर चित्रपटातील जो विषय आहे तो आमच्या मनाला लागून गेला, आज आई-वडील जीवाच रान करीत मुलांना शिकवितात, मात्र त्यानंतर पुढील शिक्षण व नोकरीसाठी परदेशात जातात तेव्हा मात्र ते आई-वडिलांना विसरण्याचे काम करतात, आई-वडिलांनी आपल्यासाठी काय केलं? जे आजची पिढी विसरत चालली आहे, मात्र मराठी चित्रपट जुनं फर्निचर हा आई-वडिलांप्रती मुलांचं काय कर्तव्य आहे हे दाखवून देत, हा चित्रपट प्रत्येक मुलांनी बघावा जेणेकरून काही प्रमाणात बदल नक्कीच घडेल.

अवश्य वाचा : 79 लाखांचे कपाशीचे चोर बीटी बियाणे जप्त

Mahesh Manjrekar New Movie आमदार जोरगेवार यांनी याबाबत सांगितले की मराठी चित्रपटसृष्टीततील नामवंत अभिनेते महेश मांजरेकर यांचा हा चित्रपट आजच्या पिढीने आवर्जून बघितल्यास देशात जे वृद्धाश्रम तयार झाले आहे ते सर्व एकदिवस नक्कीच संपणार.

Rashtriya Obc Mahasangh : ओबीसींच्या महाधिवेशनात घेणार हा महत्वाचा ठराव

0
9th National OBC Convention

Rashtriya Obc Mahasangh दिनांक ७ ऑगस्ट २०२४ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर, पंजाब राज्यात आयोजीत करण्यात आले आहे.

ताडोब्याची बातमी :अखेर त्या नरभक्षक वाघाला वनविभागाने पकडले

Rashtriya Obc Mahasangh सदर अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने चंद्रपुर येथे रविवार दिनांक १९ मे २०२४ रोजी बैठकीचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपुर येथे दुपारी ३ वाजता कऱण्यात आले होते,

कारवाई बातमी : 79 लाखांचे चोर बीटी कपाशी बियाणे जप्त

या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी. ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रीमिलेयरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत क्रीमिलेयरची मर्यादा २० लाख रुपये करण्यात यावी. मंडल आयोग आणि स्वामिनाथ आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या.

अवश्य वाचा : राज्यात वेळेपूर्वी दाखल होणार मान्सून

Rashtriya Obc Mahasangh ओबीसी प्रवर्गाचा अँट्रासिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा. इतर मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आणि राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या वर्षभरातील कार्यक्रम ठरविण्यासाठी ,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती. अध्यक्षीय भाषणात बोलताना मनाले की आपल्या अधिकारासाठी महाधिवेशनात सामील व्हा असे आवाहन केले.

 

 

बैठकीतचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी आज पर्यंत झालेल्या अधिवेशन बद्दल माहिती दिली.

बैठकीत सहसचिव शरद वानखेडे , राज्य कार्याध्यक्ष दिनेश चोखारे कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष शाम लेडे, ऍड पुरुषोत्तम सातपुते, विजय चहारे, प्रा अनिल शिंदे , माजी नगरसेवक प्रदिप देशमुख, वणीचे जिल्हाध्यक्ष विजय पिदूरकर, शाम राजूरकर , प्रा नितीन कुकडे, कवडू मांडवकर, प्रदिप पावडे,रामदास कामडी , प्रा बबनराव राजूरकर, अशोक सोनटक्के,दिनकरराव शिनगारे, अरुण चौधरी,कवडू लोहकरे तुळशीदास भुरसे, योगराज कावळे सुधाकर काकडे निखिल उपासे कालिदास येरगुडे मनोज बेले ,अक्षय येरगुडे ,अजय बलकी,मनीषा बोबडे, कुसुमताई उदार,ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे , प्रेमानंद जोगी, पांडुरंग गावतुरे ओबीसी महासंघ ,महिला महासंघ, युवा – युवती महासंघ, कर्मचारी महासंघ, किसान महासंघ, विद्यार्थी महासंघ , वकील महासंघ तसेच तालुका अध्यक्ष व सर्व कार्यकर्त् बैठकीला उपस्थित होते.

Chandrapur cha raja : चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाची वार्षिक कार्यकारणी गठीत

0
Jatpura yuvak ganesh mandal

Chandrapur cha raja चंद्रपुरातील मानाचा गणपती म्हणून प्रख्यात असलेल्या चंद्रपूर चा राजा गणेश मंडळाची वर्ष 2024 ची कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.

अवश्य वाचा – 3 नागरिकांची शिकार करणारा वाघ जेरबंद

Chandrapur cha raja विशेष म्हणजे चंद्रपूर चा राजा जटपूरा युवक गणेश मंडळ यंदा 50 व्या वर्षात पदार्पण करीत आहे, मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष यंदा मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे.

महत्वाचे – चंद्रपुरातील होर्डिंग्ज चे ऑडिट करा

वार्षिक कार्यकारिणीत यंदा संस्थेचे अध्यक्ष श्री दिपक बेले यांचा अध्यक्षतेखाली शनिवार दि.18/5/2024 रोजी झालेल्या मंडळाचा बैठकीत वार्षिक उत्सव कार्यकारिणी ची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 

Chandrapur cha raja अध्यक्षपदाचा मान यंदा अध्यक्ष: देवेंद्र बेले, उपाध्यक्ष:- श्री राहुल बेले व श्री चिराग नथवानी, सचिव:- श्री शैलेश जुमडे , सहसचिव:- श्री संकेत पुण्यप्रेड्डीवार, कोषाध्यक्ष:- श्री निश्चल बेले यांना मिळाला आहे.

या नवीन उत्सव कार्यकारिणी च्या नेतृत्वात आणि सर्व सदस्यांचा सहकार्याने सुवर्ण महोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार आहे. मंडळाच्या सर्व सदस्यांनी नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!