Tehsildar suspended : कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर यांचं निलंबन

Tehsildar suspended अखेर कोरपना तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित, कढोली खुर्द अवैध सरपंच निवड प्रकरण भोवले

Tehsildar suspended कोरपना : कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह दोन सदस्य अपात्र झाल्यानंतर त्यांच्या अपिलाची 15 दिवसांची मुदत असताना त्यापूर्वी सरपंच निवड सभा घेऊन नवीन सरपंच निवड करण्यात आली होती. त्यामुळे उपसरपंच डॉ. विनायक डोहे यांनी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना पत्र देऊन कोरपना तहसीलदार यांनी घेतलेली सरपंच निवड सभा रद्द करावी तसेच तहसीलदार यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी केली होती. या तक्रारीची राज्य शासनाने दखल घेत कोरपना तहसीलदार व्हटकर यांना 27 सप्टेंबर रोजी निलंबित केले आहे.

अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांची संसदीय समितीवर नियुक्ती


डॉ. विनायक विठ्ठलराव डोहे, उपसरपंच कढोली खुर्द यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, ग्रामपंचायत कढोली खुर्द ता. कोरपना जि. चंद्रपूरच्या सरपंच सौ. निर्मला कवडू मरस्कोल्हे आणि सदस्य सौ. सीताबाई पंधरे यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार 12 ऑगस्ट 2024 रोजी अपात्र ठरविण्यात आले होते. (Tehsildar suspended)

या आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे दाद मागण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार 26 ऑगस्ट रोजी नागपूर येथे सुनावणीचे पत्र तहसीलदार यांच्यासह संबंधित सर्वाना देण्यात आले होते. तरीही तहसीलदार यांनी 19 ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार सरपंच निवडीकरिता 26 ऑगस्ट 2024 रोजी सभा घेतली व काँग्रेस समर्थित उमाजी आत्राम यांची सरपंचपदी निवड केली. (Chandrapur news)

अपिलाची मुदत 15 दिवस म्हणजे 27 ऑगस्ट पर्यंत असताना ती संपायच्या आत ही सभा घेण्यात आली आहे. तहसीलदार कोरपना यांनी पैसे खाऊन, एकतर्फी आदेश काढून घाईने सभा घेतल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच सदर सरपंच निवड रद्द करावी. अशी तक्रार करण्यात आली होती.


या तक्रारीची दखल घेत तहसीलदार कोरपना यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान कढोली खुर्द येथे माजी सरपंच व उपसरपंच यांनी भाजपा प्रवेश केल्याने आता प्रथमच सत्ता भाजपाकडे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

961 लाभार्थ्यांना मिळणार हक्काचं घर

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!