Today Tiger In cage : ती वाघीण अखेर जेरबंद

tiger in cage चंद्रपुर वनविभागातील मुल उपक्षेत्रा अंतर्गत T-83 वाघ (मादि) यशस्वीरित्या जेरबंद
(वाघाच्या भीतीची दहशत तूर्तास कमी)


Tiger in cage (गुरू गुरनुले) मुल -दिनांक २८/९/२४ रोजी सकाळी ५.३० वाजता चंद्रपुर वनविभागा अतंर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील जानाळा, कांतापेठ, चिरोली, कवडपेठ, चिचाळा, ताडाळा परिसरातील मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना वांरवार घडत असल्याने सदर वाघिणीला जेरबंद करण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले होते.

ग्रामीण भागात वारंवार घडत असलेल्या मानव वन्यजीव संघर्ष थांबावा यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला घेराव टाकत आंदोलन केले होते, गिर्हे यांच्या आक्रमक आंदोलनानंतर वनविभाग खळबळून जागे झाले आणि त्यांनी वाघिणीला जेरबंद करण्याचे निर्देश दिले.

chandrapur live news
शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली घेराव आंदोलन

डॉ. जितेंद्र रामगांवकर, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपुर वनवृत्त, चंद्रपुर यांचे सुचनेनुसार,श्री.आनंद रेड्डी, उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर चंद्रपुर व प्रशांत खाडे, विभागीय वन अधीकारी, चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर, तसेच श्री.व्ही.एस.तरसे, सहाय्यक वनसरंक्षक (तेंदु), चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर मा. श्री. बाटोरे, सर सहाय्यक वनसंरक्षक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली चिचपल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या जानाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 717 मध्ये T-83 वाघ (मादीला) कु. प्रियंका आर. वेलमे, वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपत्ल्ली (प्रादे) तसेच श्री. राहुल कारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, बफर मुल आणी श्री. डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर, श्री. राकेश आहुजा, बायोलॉजीस्ट ब्रम्हपुरी यांचे नेतृत्वात अजय मराठे, शार्प शूटर यांनी यशस्वीरित्या बेशुध्द करुन T-83 वाघ (मादीला) जेरबंद केले. (Tiger)

अवश्य वाचा : शिक्षणाधिकारी यांच्या नावावर मागितली 50 हजाराची लाच

सदर मोहीमेत पी. डी. खनके, क्षेत्र सहाय्यक महादवाडी, एन. डब्ल्यू, पडवे, क्षेत्र सहाय्यक केळझर, एम.जे.मस्के, क्षेत्र सहाय्यक मुल, राकेश गुरनुले वनरक्षक जानाळा, एस.आर.ठाकुर, वनरक्षक मूल, शीतल व्याहाडकर, वनरक्षक चिचाळा, कु. शुभांगी गुरनुले, वनरक्षक दहेगांव अती कु. सविता गेडाम, वनरक्षक चिरोली, पवन येसांबरे, वनरक्षक महादवाडी, जि. जे. दिवठे, वनरक्षक पिंपळखुट एस.एस. बावणे, वनरक्षक गिलबीली 2 तसचे RRT ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर मधील विकास ताजणे, योगेश लाकडे, प्रफुल वाडगुरे, गुणांक ढोरे, दिपेश टेभुणे, वसीम शेख, अमोर कोरपे, अक्षय दांडेकर आणी चिचपल्ली परिक्षेत्रातील वनमजूर सर्व उपस्थीत राहुन मोलाचे सहकार्य केले. (Tiger in cage)

अवश्य वाचा : मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी आमदार जोरगेवार यांनी दाखवली तत्परता


श्री. डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर व त्यांचे चमुने आत्तापर्यंत मानव वन्यजीव संघर्ष प्रकरणातील 71 वाघ यशस्वीरित्या जेरबंद केले ही एक उल्लेखनिय बाब असल्याचे
प्रियंका आर. वेलमे वनपरिक्षेत्र अधिकारी, चिचपल्ली (प्रादे) यांनी सांगितले आहे. या मोहिमेत संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष प्राणी मित्र उमेश झिरे व त्यांच्या संपूर्ण टिंमचे सहकार्य मिळाले आहे. Tiger

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!