warora assembly : वरोरा विधानसभेचा उमेदवार ठरला, शेतकऱ्यांनी केले शिक्कामोर्तब

warora assembly वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातून राजू कुकडे यांना उमेदवारी द्या, शेतकऱ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी.

Warora assembly चंद्रपूर:- जिल्ह्यातील वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे हे कुठल्या ना कुठल्या विषयाला घेऊन नेहमीच आंदोलने मोर्चे व जनता दरबार या माध्यमातून चर्चेत राहत असून नुकतेच त्यांनी वरोरा उपविभागीय कार्यालयासमोर केलेले ठिय्या आंदोलन करून शेतकऱ्यांचा कर्जमाफी पीक विमा व स्थानिक कंपन्यात मराठी तरुणांना रोजगार मिळावा अन्यथा खळखट्याक करू असा इशारा दिला होता, त्यांचे वरोरा भद्रावती तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब व शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठीचे कार्य सर्वानाचं माहीत आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणाऱ्या राजू कुकडे यांना मनसेने उमेदवारी द्यावी अशी मागणी वरोरा भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

अवश्य वाचा : चंद्रपूर शहरातील हा मार्ग 28 सप्टेंबर रोजी बंद

या पत्रात शेतकऱ्यांनी म्हणतात की राज ठाकरे हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी चंद्रपूर आणि राजुरा विधानसभा क्षेत्राचे उमेदवार घोषित केले, पण ज्या विधानसभा क्षेत्रात पक्षाचे चांगले काम आहे, मागील निवडणुकीत जवळपास 35 हजार मतदान पक्षाच्या उमेदवाराला मिळाले होते व 18 वर्षांपासून पक्षात काम करणारे उच्चशिक्षित, चांगले वक्ते व वरोरा येथील “राजगड” या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेऊन गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविणारे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे हे उत्कृष्ट काम करताहेत त्या राजू कुकडे यांची उमेदवारी जाहीर केली नाही, त्यामुळे आम्ही नाराज आहो.

कारण आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून दुसऱ्यांचे नांव समोर करण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहे, आपण म्हटलं होतं की माझ्या पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पाहिलं प्राधान्य देणारं, पण राजू कुकडे सारखा प्रामाणिक कार्यकर्ता याला डावलण्याचा प्रयत्न का होतं आहे हे समजत नाही, कदाचित आपल्याकडे वरिष्ठ पदाधिकारी चुकीची माहिती देत असावे यासाठी आम्ही सगळे शेतकरी मिळून हे पत्र आपणांस पाठवून आमचा शेतकरी नेता, गोरगरीब जनतेचा आवाज असलेला नेता राजू कुकडे यांना आपण उमेदवारी द्यावी अशी मागणी करत आहो असे नमूद केले आहे. (Warora assembly)

वरोरा येथे ज्या राजूरकर यांच्या घरी राज ठाकरे गेले होते त्यांनी मनसे सोडून भाजपा मध्ये प्रवेश घेतला, पण राजू कुकडे यांनी या विधानसभा क्षेत्रात पक्षाचे गावागावात कार्यकर्ते निर्माण करून येणाऱ्या विधानसभा निवडणूकीची तयारी केली आहे, राजू कुकडे हे कोट्यावधी रुपये खर्च करणार नाही व त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांना पैसे मिळणार नाही हे सत्य जरी असले तरी गरिबांच्या मुलाने अहोरात्र प्रयत्न करून पक्षाची बांधणी केली त्याला निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार नाही कां? हा प्रश्न उपस्थित होतं आहे.

कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून याचं राजू कुकडे यांनी आम्हा शेतकऱ्यांना मुंबई येथे स्वखर्चाने राज ठाकरे यांच्याकडे आणलं होतं, हिवाळी अधिवेशना दरम्यान रस्ता रोको आंदोलन करून सरकार ला धारेवर धरून सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास बाध्य केलं होतं, शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन ठिय्या आंदोलन केले, मग एवढे सगळे पक्षाला मजबूत करणारे काम राजू कुकडे करत असतांना त्यांना उमेदवारी का मिळतं नाही? हा प्रश्न करून आम्हांला संशय आहे की राजू कुकडे यांचं नांव राज ठाकरे यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी पाठवलं नसावं व त्यांना राज ठाकरे यांची भेट होऊ दिली नसावी त्यामुळे राजू कुकडे यांची उमेदवारी आपण घोषित केली नाही. Warora assembly

प्रसंगी लोकवर्गणी करून राजू कुकडे यांना निवडून आणू.

शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे की राजू कुकडे यांना वरोरा भद्रावती विधानसभा निवडणुकीत मनसेची उमेदवारी जाहीर करावी व त्याच्या मेहनतीचा आदर करावा, आम्ही निश्चितपणे त्यांना निवडून आणण्याचा प्रसंगी लोकवर्गणी काढून त्यांचा प्रचार करण्याचा संकल्प केलेला आहे, कारण पक्षाला अनेक हौशी कार्यकर्ते भेटतील पण राजू कुकडे सारखा इमानदार, उच्चशिक्षित व प्रभावी वक्ता मिळणार नाही याचा आपण विचार करावा व आपण आमच्या या पत्राचा गांभीर्याने विचार करून राजू कुकडे यांची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. Warora Assembly

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!