Amma chandrapur : निराधारांना आधार देणारी ‘अम्मा” यांचं निधन

amma chandrapur आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांचे आज आजाराने निधन झाले. चंद्रपूर येथील राजमाता निवासस्थानी सकाळी 9.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदार, डाव कुणाचा?, प्रशासनाने केली पोलिसात तक्रार

Amma chandrapur सोमवारी 21 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता गांधी चौक येथील कोतवाली वार्ड येथील घरून अंत्ययात्रा निघणार आहे. बिनवा गेट येथील शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.

अम्मांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या नावाने चंद्रपूरात सुरु असलेल्या “अम्मा का टिफिन” आणि “अम्मा कि दुकान” या उपक्रमामुळे अनेकांना हक्काची साथ मिळाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने उपचारासाठी त्यांना नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. amma chandrapur

सामाजिक : त्या दोघांसाठी आमदार जोरगेवार बनले देवदूत

जवळपास 10 दिवस नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने काल शनिवारीच त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. घरी डॉक्टरांच्या निगराणीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाला आणि सकाळी 9.30 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मागील अनेक वर्षांपासून गंगुबाई उर्फ अम्मा या गांधी चौकात टोपल्या विकायच्या, आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती, गरिबी व संघर्षांच्या काळात त्यांनी टोपल्या विणून मुलगा किशोर व प्रशांत यांना मोठं केलं, विशेष बाब म्हणजे अम्मा चा आशीर्वाद सोबत घेत किशोर जोरगेवार हे समाजकार्यात रुजू झाले, काळ लोटला आणि वर्ष 2019 ला किशोर जोरगेवार हे आमदार बनले, अनेक भाषणावेळी मी टोपली विकणाऱ्याचा मुलगा आहे माझी आई आजही टोपल्या विकते असा उल्लेख आमदार जोरगेवार करायचे.

शहरातील असलेले निराधार नागरिक उपाशी झोपू नये यासाठी गंगुबाई यांनी किशोर जोरगेवार यांना निराधार नागरिकांना आपल्याद्वारे टिफिन उपलब्ध करूया अशी कल्पना दिली, मातोश्री चा आदेश मिळाल्यावर आमदार जोरगेवार यांनी अम्मा का टिफिन उपक्रम राबविला.

आज निराधारांचा आधार हिरावला, आज अनेक निराधारांचे डोळे अम्माच्या जाण्याने अश्रूने पाणावले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!