Assembly candidate list bjp : चंद्रपूर जिल्ह्यातून भाजपचे 2 दिग्गज पुन्हा निवडणुकीच्या मैदानात

Assembly candidate list bjp भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Assembly candidate list bjp विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 29 ऑक्टोबर असून उमेदवारी मागे घेण्याची तारीख ही 30 ऑक्टोबर आहे, विशेष म्हणजे 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

भाजपची यादी

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मिळालेले मोठे यश बघता विधानसभा निवडणुकीत सुद्धा mva आघाडीवर राहणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.

महत्त्वाचे : चंद्रपूरचे विद्यमान आमदार जोरगेवार यांना मातृशोक

राष्ट्रवादी कांग्रेस व शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक असणार, यामध्ये राष्ट्रवादी-शिवसेना दोन्ही पक्ष एकमेकांना भिडणार आहे.

भाजप केंद्रीय समितीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत 99 उमेदवारांचा समावेश आहे, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना नागपूर-दक्षिण-पश्चिम, चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मधून तर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून सुधीर मुनगंटीवार, चिमूर विधानसभा क्षेत्रातून बंटी भांगडीया यांच्या नावाचा समावेश आहे.

भाजप, राष्ट्रवादी कांग्रेस व वंचित आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे मात्र अद्यापही महाविकास आघाडी, शिवसेना शिंदे यांनी उमेदवार घोषित केले नाही.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!