Brahmapuri Assembly Constituency : विकासक्रांती मुळे विजय वडेट्टीवार यांचं पारडं जड

Brahmapuri Assembly Constituency ब्रम्हपुरी मतदारसंघात केलेल्या “विकासक्रांतीमुळे’ वडेट्टीवारांचे पारडे जड

Brahmapuri Assembly Constituency २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे नुकतेच बिगुल वाजले. सर्व राजकीय पक्ष होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागून उमेदवार चाचपणीत व्यस्त झाले आहे. अशातच संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात राज्याचे विरोधी पक्षनेते,काँग्रेस पक्षनेते तथा महाविकास आघाडीचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विकास क्रांतीमुळे त्यांचे पारडे जड असुन भाजप व अन्य पक्षाला या विधानसभा क्षेत्र निवडणूकीत तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवली आहे.

महत्त्वाचे : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले हे महत्वाचे आवाहन

राज्याच्या राजकारणात राज्याचे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून विजय वडेट्टीवार हे नाव कानाकोपऱ्यात पोहचले आहे. वनविकास महामंडळ अध्यक्ष ते राज्याचे विरोधी पक्षनेते पदापर्यंत मजल मारतांना अनेक कठीण परिश्रम घेणाऱ्या वडेट्टीवारांनी जनतेच्या मूलभूत गरजा, क्षेत्राच्या अडचणी, क्षेत्रात सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती, व सामजिक गरजा लक्षात घेत सर्व धर्म, सर्व समाज यांना न्याय देऊन मतदारांची मने जिंकली. (Brahmapuri Assembly Constituency)

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यांतील करंजी हि त्यांची जन्म भूमी असली तरी वडिलांचे छत्र हरपल्या नंतर गडचिरोली येथे त्यांच्या कुटुंबाचे स्थानांतर झाले. अगदी कमी वयात लोकसेवा करण्यासाठी दुर्गम गडचिरोली जिल्हा पिंजून काढून अनेक प्रश्नांना घेऊन त्यांनीं आंदोलने केली. व जनतेसाठी तुरुंगवास देखील भोगला. यानंतर त्यांनीं चिमूर विधानसभेवर विजय मिळवला. तर मागील दहा वर्षापासून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे ते प्रतिनिधित्व करीत आहे. (Brahmapuri Assembly Constituency)

झुडपात खेळ सुरू, 7 जणांना अटक


राजकारणा पुरते राजकरण मात्र उर्वरित वेळेत क्षेत्राचा सर्वांगिण विकास , जनतेच्या मूलभूत समस्या, आरोग्याच्या समस्या, शुद्ध पेयजल, उच्च प्रतीचे प्रवास मार्ग, सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांच्या हाती काम, आरोग्य शिबिरे,शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वाचनालये, क्रीडा पट्टू साठी क्रीडा मैदाने व ईतर गरजा पूर्ण करीत क्षेत्राचा विकास साधण्यात त्यांनीं कुठलीही कसर सोडली नाही.

२०१४ च्या निवडणुकांमध्ये संपूर्ण देशात मोदी लाट असताना व खुद्द मोदी हे ब्रम्हपुरी येथे प्रचार सभेसाठी आले असतांनाही जनतेनी पुर्ण ताकदीनिशी वडेट्टीवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विजयश्रीची माळ त्यांच्याच गळ्यात घातली. आज घडीला काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात कुठला उमेदवार द्यावा असा पेच विरोधकांपुढे उभा ठाकला आहे.

गेल्या १० वर्षात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात गोसेखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यातून मुबलक पाणी क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिले. यामुळें ब्रम्हपुरी मतदार संघातील सावली, ब्रम्हपुरी, व सिंदेवाही या तीनही तालुक्यांतील ८० टक्के शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली येऊन समृद्ध शेती कडे वाटचाल सुरू आहे. या सर्व विकासात्मक दूर दृष्टिकोना मुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात विजय वडेट्टीवार यांचेच पारडे जड असुन विरोधी पक्षांच्या उमेदवारांना येथे आगामी निवडणुकांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. हे तेवढेच सत्य…!

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!