chandrapur sexual assault : कोरपना शहरात सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा

chandrapur sexual assault चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील एका नामांकित शाळेत 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीची औषध देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली, अत्याचार प्रकरणातील आरोपी अमोल लोडे हा कोरपना युवक कांग्रेसचा अध्यक्ष व शिक्षक आहे. दुसऱ्या दिवशी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी अमोल लोडे ला अकोला बस स्थानक येथून अटक केली.


chandrapur sexual assault पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेबाबत शाळेतील संपूर्ण व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करीत आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली.
3 ऑक्टोबर रोजी कोरपना शहरात सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला, आयोजित मोर्च्यात भाजप, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना व इतर सामाजिक संघटनां मोर्च्यात सहभागी झाले होते.

आक्रोश मोर्चा

शहरातील मुख्य चौकात आंदोलकांनी कॉर्नर सभा घेत आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी केली.

अवश्य वाचा : चंद्रपुरातील भावी आमदारांची कहाणी


पालकमंत्री मुनगंटीवार यांनी या गंभीर प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत विविध विभागातील अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली, ते यावेळी म्हणाले की सदर प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपी अमोल लोडे वर कठोर शासन व्हायला हवे, या अत्याचारात अजून कुणी सहभागी आहे का त्याबाबत पोलिसांनी चौकशी करावी व शाळेच्या व्यवस्थापनावर सुद्धा गुन्हा चौकशी करून दाखल करायला हवा अशी मागणी केली. (chandrapur sexual assault)


5 वर्षांपूर्वी आमदार सुभाष धोटे यांच्या शैक्षणिक संस्थेत सुद्धा असाच प्रकार घडला होता, त्यावेळी अनेक मुलींनी पुढे येत अत्याचाराची तक्रार केली, त्या प्रकरणाबाबत सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली.


याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळेची मान्यता रद्द करण्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली सोबतच आरोपीची नार्को टेस्ट, 6 महिन्यात अत्याचार प्रकरणाचा निकाल, आरोपी जवळ गुंगीचे औषध कुठून आलं? याची चौकशी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली, व आमदार सुभाष धोटे यांच्या संस्थेत 5 वर्षांपूर्वी झालेल्या अत्याचार प्रकरणाचा निकाल महिन्याभरात लागला पाहिजे असे पत्र कोरपना येथील महिला मंडळ देशाच्या चीफ जस्टिक ला पाठविणार असल्याची माहिती दिली, कोरपना अत्याचार प्रकरण अधिवक्ता उज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावे अशी मागणी महिला मंडळांनी केली आहे.
येत्या काही दिवसात कोरपना शहराला राजकीय छावणीचे स्वरूप येणार हे आता नक्कीचं.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!