Mahakali mata palkhi : हजारो नागरिकांच्या उपस्थितीत चंद्रपुरात निघाली माता महाकालीची पालखी

Mahakali mata palkhi श्री माता महाकाली महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातून नगर प्रदक्षिणा पालखीचे आयोजन करण्यात आले होते. राजस्थानी रथात मातेची मूर्ती आणि चांदीच्या भव्य पालखीत महाकालीची चांदीची मूर्ती ठेवत भव्य दिव्य पालखी शोभायात्रा निघाली. या सोहळ्यात सादर केलेल्या देखाव्यांनी भक्तांचे मनोवेधन केले. चांदीच्या पालखीत चांदीच्या मूर्तीसह निघालेल्या मातेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी चंद्रपूरकरांची अलोट गर्दी शहराच्या रस्त्यावर उसळली होती. 

महत्त्वाचे : मिस कॉल द्या आणि मिळवा सुरक्षेची हमी

  
   Mahakali mata palkhi  दरवर्षी प्रमाणे यंदा ही माताच्या पालखी शोभायात्रेतील भव्यतेने सोहळा अभुतपुर्व बनविला. महाकाली मंदिर ते जटपूरा गेटच्या पूढे पर्यंत ही शोभायात्रा होती. त्यामुळे या पालखी शोभायात्रेला भव्यता प्राप्त झाली. दरवर्षी ही पालखी शोभायात्रा वाढत असून याला मोठा लोकसहभाग लाभत आहे. विशेष म्हणजे या पालखी शोभायात्रेत शहरातील अनेक गणेश मंडळ आणि समाजाच्या वतीने आर्कर्षक देखावे सादर करण्यात आले. हे नेत्रदिपक देखावे पाहण्यासाठी चंद्रपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. Chandrapur

    सर्वप्रथम, काशी येथील गंगा आरतीचे प्रदर्शन झाले, त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी पालखी उचलून नगर प्रदक्षिणा सोहळ्याला विधिवत प्रारंभ केला. या शोभायात्रेची सुरुवात माता महाकाली मंदिरातून झाली. यात राजस्थानी रथ, चांदीची मूर्ती, उज्जैनचे झांज-डमरू पथक, पोतराजे, हरियाणा राज्यातील महामृत्युंजय अघोरी नृत्य, पवनसुत प्रभु श्री हनुमान यांचे देखावे, उत्तर प्रदेशातील ३३ मुखी काली मातेसह अन्य देखावे, आदिवासी नृत्य, अश्वावर आरूढ नवदुर्गांचे देखावे, शस्त्र प्रात्यक्षिक, राणी हिराई वर आधारित देखावे आणि सामाजिक संदेश देणारे विविध देखावे या शोभायात्रेत सहभागी झाले होते. पालखी जटपूरा गेटला वळसा घेत पुन्हा माता महाकाली मंदिरात पोहोचली. या शोभायात्रेला पाहण्यासाठी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. (Mahakali mata palkhi)


शहनाज अख्तर यांच्या रोड शो ने उत्सवात भरली रंगत
नगर प्रदक्षिणा सोहळ्याच्या आकर्षणात सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांच्या ‘‘मुझे चढ़ गया भगवा रंग‘‘ या गाण्याचा रोड शो होता. शहनाज अख्तर यांच्या गाण्यांनी उत्सवात भक्ती आणि जल्लोषाची एक विशेष उधळण केली. त्यांच्या गाण्यांसाठी आणि दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे कार्यक्रमात एक अतिरिक्त रंगत भरली. (Chandrapur)


विविध प्रकारचे आदिवासी नृत्य
चंद्रपूरात निघालेल्या पालखी शोभायात्रेत ढेमसा आदिवासी पारंपरिक नृत्य, ढोलशा आदिवासी पारंपरिक नृत्य, आणि रेला आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. हे पारंपरिक नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


विविध सेवाभावी संस्थांकडून पाणी व भोजनदान
नगर प्रदक्षिणा पालखी शोभायात्रेत अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने सेवा देण्यात आली होती. यावेळी गिरनार चौक येथे पवन सादमवार यांनी मसाला भात वाटप केला, तर शंशात बैस, हुसेन अकोलावाला, प्रवीण सारडा, पराग सब्बनवार, अन्वर अली, मनोहर उमाटे, धीरज चौधरी,  शारुक मिस्झा, संदीप बांठिया यांच्यासह एलिवेट ग्रुप, बोहरा समाज, माहेश्वरी समाज, इलेक्ट्रिकल असोसिएशन, जटपूरा यंग मुस्लिम कमिटी आणि इतर अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने शरबत, पाणी, आणि भोजनदान केले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!