Assembly Election Rebellion : चंद्रपूर जिल्ह्यातील या विधानसभा क्षेत्रात बंडखोरी

Assembly Election Rebellion चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 25 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असून आता सहा विधानसभा क्षेत्रात एकूण 95 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे.


Assembly Election Rebellion जिल्ह्यातील 6 विधानसभा पैकी चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज करीत पक्षासमोर बंड केले आहे, तर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी भाजप उमेदवार विरोधात बंड पुकारले आहे.


जिल्ह्यात एकूण 150 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते त्यापैकी 30 अर्ज त्रुटी पूर्ण आढळल्याने फेटाळण्यात आले त्यामुळे 120 उमेदवारांचे अर्ज कायम होते.
4 नोव्हेंबर रोजी 25 उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतले आता एकूण 95 उमेदवार एकमेकांविरुद्ध भिडणार आहे. Assembly Election Rebellion

चंद्रपूर विधानसभा क्षेत्र

महायुतीचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार, महाविकास आघाडी कडून प्रवीण पडवेकर, कांग्रेसचे बंडखोर राजू झोडे व भाजपचे बंडखोर ब्रिजभूषण पाझारे यांची लढत या विधानसभा क्षेत्रात होणार आहे. Assembly Election Rebellion

बल्लारपूर विधानसभा

महायुती तर्फे भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी कांग्रेसचे संतोष रावत व कांग्रेसच्या बंडखोर अभिलाषा गावतुरे निवडणूक लढणार आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्र

महाविकास आघाडी कांग्रेसचे सुभाष धोटे, महायुती भाजपचे देवराव भोंगळे, तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्ती शेतकरी संघटनेचे वामनराव चटप यांचॅट थेट लढत होणार आहे.
देवराव भोंगळे हे बाहेरचे उमेदवार आहे असा ठपका राजुरा विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार संजय धोटे व सुदर्शन निमकर यांनी ठेवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र भाजपच्या नेत्यांनी दोघांचे बंड शमविले. Assembly Election Rebellion

वरोरा विधानसभा

महाविकास आघाडी कांग्रेसचे प्रवीण काकडे, महायुती चे करन देवतळे, उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत बंडखोरी केली आहे. Assembly Election Rebellion

आमची सत्ता आली तर लाडक्या बहिणींना प्रतिमाह अडीच हजार रुपये देणार – विजय वडेट्टीवार


दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे भाऊ अनिल धानोरकर यांना कांग्रेसने उमेदवारी नाकारल्यावर त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असुन तो कायम ठेवला आहे.

चंद्रपुरात फसवणुकीचा नवा फंडा


यासह कांग्रेसचे इच्छुक उमेदवार चेतन खुटेमाटे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे, भाजपचे माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली तिसरी आघाडी प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी कायम ठेवली असून वरोरा विधानसभा क्षेत्रात मुकेश जीवतोडे यांच्या उमेदवारी मुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार हे निश्चित.

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र

महाविकास आघाडी कांग्रेसचे विजय वडेट्टीवार, महायुती भाजपचे कृष्णा सहारे यांची थेट लढत होणार आहे, तत्पूर्वी भाजपचे वसंत वारजूरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत बंडखोरी केली होती मात्र भाजपने त्यांची समजूत काढत उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला त्यामुळे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे.

happy Diwali ad

चिमूर विधानसभा क्षेत्र

चिमूर विधानसभा क्षेत्रातून महाविकास आघाडी कांग्रेसचे सतीश वारजूरकर विरुद्ध महायुती भाजप चे बंटी भांगडीया यांची थेट लढत होणार आहे.
याठिकाणी कांग्रेस कडून धनराज मुंगळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यांची समजूत काढण्यास महाविकास आघाडीला यश मिळाले.

कुणी घेतली माघार? चंद्रपूर विधानसभा क्षेत्र

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात प्रियदर्शन अजय इंगळे यांनी माघार घेतली असून आता या विधानसभा क्षेत्रात 16 उमेदवार रिंगणात कायम आहे.

बल्लारपूर विधानसभा

चव्हाण रामराव ओंकार, डॉ.राकेश गावतुरे, गावतुरे अनिता सुधाकर, डॉ.सत्यपाल राघोजी कातकर, डॉ.संजय घाटे, नरेंद्र शंकर सोनारकर, गिर्हे अनिल संदीप.

राजुरा विधानसभा क्षेत्र

निमकर सुदर्शन भगवानराव, संजय यादवराव धोटे, चव्हाण रेशमा गणपत

चिमूर विधानसभा क्षेत्र

हेमंत सुखदेव उरकुडे, योगेश नामदेवराव गोन्नाडे, धनराज रघुनाथ मुंगले, डॉ.प्रकाश नक्कल नान्हे.

ब्रह्मपुरी विधानसभा

वसंत नारायण वारजूरकर, प्रेमलाल रामकिसन मेश्राम, विनोद अंबादास नवघडे, अनंता लालाजी भोयर.

वरोरा विधानसभा

रंजना मनोहर पारशिवे, अमोल दिलीप बावणे, जयंत मोरेश्वर टेमुर्डे, महेश पंढरीनाथ ठेंगणे, नरेंद्र नानाजी जीवतोडे, रमेश महादेवराव राजूरकर

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!