Chandrapur pollution issues । रस्ता खोदकामामुळे नागरिकांचे चेहरे ‘लाल”

Chandrapur pollution issues

Chandrapur pollution issues : दक्षिण भारताच्या जवळ असलेला चंद्रपूर जिल्हा, ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून व औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे सोबतच प्रदूषणासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात अनेकी प्रदूषण पसरविणारे उद्योग आहे मात्र उद्योगातून निघणार जीवघेणं प्रदूषण थांबविण्याची एकाही लोकप्रतिनिधी मध्ये हिंमत नाही. विकासाच्या नावावर चंद्रपूर शहरात सध्या वायू प्रदूषण सुरु आहे. Chandrapur pollution issues

अमृत व भूमिगत गटार योजनेचे काम सध्या शहरात सुरु आहे, १६ वर्षांपूर्वी सुद्धा चंद्रपुरात भूमिगत गटार योजनेचे काम झाले विशेष म्हणजे कंत्राटदाराला पूर्ण पैसे मिळाले मात्र योजना फसल्याने नागरिकांच्या कराचे पैसे बुडाले आता पुन्हा ५०४ कोटी रुपये खर्च भूमिगत गटार योजनेचे काम सुरु करण्यात आले आहे. Chandrapur underground drainage project

चंद्रपुरात भीषण अपघात, ट्र्क चालक जिवंत जळाला

या कामामुळे शहरातील नागरिकांचे चेहरे मेकअप विना लाल होताना दिसत आहे, रस्ता खोदून त्याला कित्येक दिवस तसेच ठेवायचं आणि जनतेला नाहक त्रास द्यायचा हे काम मनपाने सुरु केले आहे. लाल चेहरे फक्त नागरिकांचे होत आहे कारण लोकप्रतिनिधी काचबंद वाहनात असल्याने त्यांच्या चेहऱ्याला लाल धूळ स्पर्श करू शकत नाही.

जटपुरा गेट समोर रस्त्याची एक बाजू पूर्णतः बंद करण्यात आली आहे, त्यामुळे या मार्गावर उडणाऱ्या धुळीने नागरिकांच्या आरोग्यावर अपायकारक परिणाम होत आहे. पण चंद्रपूरकरांना याचा काही एक फरक पडत नाही, कारण मागील अनेक वर्षांपासून चंद्रपुरातील हवा प्रदूषणयुक्त झाली आहे, तेव्हापासून आतापर्यंत नागरिकांनी आपल्या तोंडून याविरोधात एक ब्र सुद्धा काढलेला नाही तर आता कुणाला काय फरक पडणार आहे.

लोकप्रतिनिधी यांना या प्रदूषणाचा काही एक फरक पडत नाही, कारण भाड में जाये जनता अपना काम बनता हे घोषवाक्य अंगीकारत लोकप्रतिनिधी आपली वाटचाल करीत आहे. जटपुरा गेट मार्गावरून कितीही गोरा नागरिक गेल्यास तो क्षणार्धात लाल होऊनच बाहेर निघत आहे, म्हणून या मार्गावरून जाताना आपल्याला विशेष खबरदारी घ्यावी लागेल.

शहरात प्रदूषणाची तीव्रता मोजण्यासाठी कृत्रिम हृदय लावण्यात आले असता ४ दिवसात ते हृदय काळे पडले होते, यावरून समजते कि ते तर कृत्रिम होते मग नागरिकांच्या हृदयाची काय अवस्था होत असेल याबाबत विचार न केलेला बरा. वायू प्रदूषणावर जनतेनी बोलायला हवं अन्यथा भविष्यात भावी पिढीला प्रदूषणात जगावे लागणार. अनेक वर्षांपासून जिल्ह्यात प्रदूषण होत आहे. अनेकदा जगात चंद्रपूर प्रदूषणाच्या बाबतीत अव्वल आलं होत. याविरोधात जनता उठाव करेल त्यादिवशी हे प्रश्न मार्गी लागेल. अनेक दुर्धर आजारावर आपल्याकडे हॉस्पिटलची निर्मिती होते मात्र ते आजार न व्हावे यासाठी काही खबरदारी घेतली जात नाही. Air pollution in Chandrapur

शहरातील रस्ते खड्ड्यात गेले आहे, गांधी चौक ते जटपुरा गेट हा मार्ग म्हणजे अर्धा डांबरीकरण तर अर्धा काँक्रिटीकरण आहे हे चित्र फक्त आपल्या चंद्रपुरात बघायला मिळते हे विशेष. Chandrapur pollution issues

चंद्रपूर शहरातील रस्ते कित्येक वर्षांपासून अरुंद आहे त्याला रुंद करण्याचा साधा प्रयत्न कधीही झाला नाही, फक्त खोदण्याचे काम मात्र प्राथमिकतेने झाले, जर चुकून या विरोधात कुणी आंदोलन केले तर आपण समजून घ्या कि तू मारल्या सारखं कर मी रडल्यासारखं करतो. आंदोलनामागची हि पार्श्वभूमी राहणार हे नक्कीच.

Chandrapur pollution issues

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!