wildlife crime
wildlife crime : 25 जानेवारीला राजुरा तालुक्यात वाघाच्या शिकारीसाठी प्रसिद्ध असलेला शिकारी अजित सियालाल पारधी सहित 6 जणांना वनविभागाने अटक केली होती. आता या प्रकरणी पुन्हा 2 आरोपीना वेगवेगळ्या राज्यातून अटक करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला ब्लॅक गोल्ड सिटी का म्हणतात?
राजुरा तालुक्यात अजित ची उपस्थिती वनविभागाला चिंतेत आणणारी होती कारण चौकशी दरम्यान त्याने एका वाघाच्या शिकारीची कबुली दिली. (Tiger poaching network busted)
वनविभागाने वाघाचे अवयव, केस व हाडे जप्त केली, फॉरेन्सिक साठी सर्व अवयव पाठविण्यात आले सदर सर्व अवयव वाघांचे असल्याचे निष्पन्न झाले.
वनकोठडी दरम्यान अजित च्या मोबाईलवर लाखोंचा व्यवहार झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली, चौकशी केली असता त्याचे धागेदोरे मेघालय ची राजधानी शिलॉंग पर्यंत जुळलेले होते, शिलॉंग मधून माजी सैनिक लालनेईसुंग याला अटक करण्यात आली. वाघाचे इतर अवयव च्या तस्करीसाठी चीन च्या मार्गाचा वापर केल्याची चाहूल वनविभागाला लागली. (Ajit Siyalal Pardhi arrested)
रस्ता खोदकामामुळे चंद्रपुरातील नागरिकांचे चेहरे लाल
वनविभागाने अजित च्या मोबाईल ची कॉल हिस्ट्री बाबत माहिती घेतली असता पंजाब येथील सोनू सिंग सोबत त्याचा संवाद व काही आर्थिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले. (Chandrapur wildlife crime)
सोनू सिंग ला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेत चंद्रपुरात आणले, 4 फेब्रुवारी ला 6 आरोपीची रवानगी 7 फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी मध्ये करण्यात आली, सोनू सिंग ला सध्या तरी न्यायालयासमोर हजर केले नाही, एका आरोपीची आधी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. (Tiger poaching in Rajura taluka)
NTCA नवी दिल्ली तर्फे गठीत 5 सदस्यीय टीम चंद्रपूर मधील स्थानिक वनविभागाच्या मदतीने चौकशी करीत आहे तर सीसीएफ तर्फे गठीत 12 झालेल्या एसआयटी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.
कोण आहे अजित पारधी?
अजितचा प्रवास 2013 ते 2015 दरम्यान विदर्भात वाघांच्या शिकारीपासून सुरू झाला होता. 2015 मध्ये त्याची सुटका झाली होती. अजितला गेल्या वर्षी एका शिकार प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली.
अजित पारधी वर देशातील वनविभागात अनेक गुन्हे दाखल आहे. वाघाच्या शिकारीसाठी तो प्रसिद्ध असून या गुन्ह्यात त्याच्या कुटुंबातील महिला सुद्धा सहकार्य करतात. अजित हा बहेलिया टोळी चा म्होरक्या आहे.
तीन महिन्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात अजित सक्रिय
मागील 3 महिन्यापासून अजित पारधी हा चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे वास्तव्यास होता, त्याची साधी चाहूल वनविभागाला लागली नाही हे आश्चर्यकारक बाब आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या लक्षणीय आहे, मात्र वाघांना सांभाळणारे यांचं दुर्लक्ष झाले काय असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.
200 च्या वर वाघ जिल्ह्यातील जंगलात आहे, ताडोबा येथील बफर व कोर मधील वाघ सुरक्षित आहे कारण तिथं दिवसरात्र वनविभागाची यंत्रणा कार्यरत आहे, मात्र जंगलातील बाहेरच्या भागातील वाघ हे असुरक्षित आहे. कारण त्यांच्या हालचालीवर वनविभागाचे लक्ष नव्हते या बाबीचा फायदा शिकारी अजित ने उचलला आणि त्याने या 3 महिन्याच्या कालावधीत किती वाघांची शिकार केली याबाबत अजूनही वनविभाग गोपनीयता बाळगत आहे.