scrap shop fire chandrapur
scrap shop fire chandrapur : चंद्रपूर उन्हाच्या तडाख्याने सध्या तापत आहे, तापमान 42 डिग्री सेल्सिअस च्या वर गेल्याने नागरिक घराबाहेर पडत नाही आहे, मात्र आज चंद्रपूर-नागपूर मार्गावरील संजय गांधी मार्केटच्या मागील भागात असलेल्या भंगार दुकानातील काही साहित्य जाळल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. chandrapur fire news
चंद्रपुरातील नरभक्षक वाघ जेरबंद
या आगीचा विळखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहती जवळ पोहचल्याने स्थानिक नागरिकांनी एका घराचे कुलूप तोडत सिलेंडर बाहेर काढले.
नागरिकांनी याबाबत अग्निशमन विभागाला सूचित केले. यानंतर अग्निशमन विभागाने तात्काळ आगीवर नियंत्रण आणले.
स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती दिली की जवळच असलेल्या भंगार दुकानात अनेक दिवसांपासून वेस्ट मटेरियल पडले होते, बहुतेक त्यांनी ते मटेरियल जाळले मात्र त्यामुळे आगीने भीषण रूप धारण करीत आमच्या वसाहतीजवळ पोहचली भविष्यात अश्या घटना घडू नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी असे सांगितले.