summer heat safety tips । चंद्रपूरचा कडक उन्हाळा! खासदार धानोरकरांचे ७ महत्वाचे उष्माघात प्रतिबंधक उपाय

summer heat safety tips

summer heat safety tips : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा वाढला असून 40 अंश सेल्सीयस पुढे तापमान गेले आहे. यामुळे जिल्ह्यात नागरीकांच्या आरोग्यावर  उष्माघाताचा प्रकोप होऊ नये याकरीता खासदार धानोरकर यांनी प्रशासनाला सुचना केल्या आहेत. heatwave precautions

घरकुल अनुदानात तब्बल ५० हजारांची वाढ

विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु असलेल्या शाळांना तात्काळ उन्हाळी सुट्ट्या द्याव्यात. तसेच, शहरातील व तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर प्रशासनाच्या माध्यमातून पाणपोई ची व्यवस्था करण्यात यावी. ग्रामीण भागातील पाणी टंचाई करीता टॅंकर च्या संख्येत वाढ करणे, चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठ्याकरीता टोल फ्री नंबर त्यासोबतच, दुपारी 12.00 ते 04.00 या कालावधी संपुर्ण ट्रॅफीक सिग्नल बंद ठेवणे.

तालुक्यातील बाजाराच्या ठिकाणी व शहरातील वर्दळीच्या ठिकाणी आरोग्य यंत्रणेद्वारा चमु उपलब्ध करुन देण्यात यावी. त्यासोबतच सार्वजनिक स्थळे व शासकीय कार्यालयात थंड पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करणे तसेच, चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यांवर पाण्याची फवारणी करण्यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाला सुचना केल्या आहेत.

चंद्रपूर जिल्हा हा प्रामुख्याने मे महिन्यात जगात सर्वात उष्ण राहत असल्याने खासदार धानोरकर यांनी या सुचना केल्या आहेत. या सुचनांची प्रशासनाने तात्काळ दखल घेतल्यास नागरिकांना उष्माघातापासून बचाव करणे शक्य होणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!