Suresh Chopane fossil research । चंद्रपूरच्या नदीत दडलं होतं रहस्य! वाचल्यावर विश्वास बसणार नाही!

Suresh Chopane fossil research

Suresh Chopane fossil research : चंद्रपुर तालुक्यात वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात २५,००० ते १२००० वर्षादरम्यान विदर्भात विचलन करणारे आणि आज लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगाडॉन हत्तीचे जीवाश्म चंद्रपूर येथील भूशात्र संशोधक प्रा.सुरेश चोपणे ह्यांनी नुकतीच शोधली आहे .महाराष्ट्रात अश्या प्रकारची अलीकडील प्लेईस्टोसीन काळातील मिळालेली हत्तीची ही दुर्मिळ जीवाश्म आहेत. डायनोसोर नंतर विशालकाय प्राण्यांची जीवाश्मे पहिल्यांदाच विदर्भात मिळाली आहेत. ह्या जीवाश्मा सोबतच पाषाणयुगीन अवजारे सुद्धा मिळाली आहेत. दुर्मिळ हत्तींचे जीवाश्मे आणि पाषाणयुगीन अवजारे एकाच ठिकाणी सापडणे सापडणे हे अतिशय महत्वाचे मानले जाते. Extinct elephant fossils Maharashtra

चंद्रपूरचा कडक उन्हाळा, खासदार धानोरकर यांनी सुचवले उपाय

ही जीवाश्मे प्लेईस्टोसीन काळातील आणि जवळ जवळ २५००० वर्शादरम्यान विदर्भात वास्तव्य करणाऱ्या स्टेगोडॉन गणेश हत्तीची ( Stegodon Ganesa) आहेत. .हत्तीच्या दातावरून ही लुप्त झालेल्या स्टेगाडॉन हत्तीची आहेत असे मत अनेक परदेशी संशोधक तसेच वाडिया इंस्टीट्युट ऑफ हिमालयन जीओलोजी चे निवृत्त प्राध्यापक आणि संशोधक अविनाश नंदा ह्यांनी व्यक्त केले आहे. हे हत्ती २३ ते २६ हजार वर्षापूर्वी विलुप्त झाले.आजचे आशियायी हत्तींचे हे पूर्वज होते. ह्याच ठिकाणी एलेफास नामाडीकस ( Elephas Namadicus) ह्या लुप्त झालेल्या हत्ती सदृश्य डोके सुद्धा आढळल्याने ह्या हत्तीं जीवाश्मांचे चे सविस्तर विश्लेषण करण्याची गरज असल्याचे मत संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केले आहे. Pleistocene fossils Vidarbha

प्लेईस्टोसीन ह्या २ लाख ते ११,७०० वर्षाच्या कालखंडात भारतात हत्तींचे आणि पाषाण युगीन मानवांचे मोठ्या संख्येत वास्तव्य होते .ह्याच काळाच्या शेवटच्या कालखंडात हिमयुग होते.जेव्हा हे हिमयुग वितळले तेव्हा भारतात प्रचंड महापूर आले आणि ह्या महापुरात अनेक प्रजाती वाहून गेल्या.त्याच पुरातील गाळात ( अल्लुव्हींयम ) अनेक सजीवांचे पुरावे सापडतात.चंद्रपूर जिल्ह्यात सापडलेले हत्ती हे १५ फुट उंचीचे विशाल जीव होते आणि लुप्त झालेल्या हे स्टेगाडॉन हत्तींची ही जीवाश्मे महाराष्ट्रात प्रथमताच मिळाली आहेत अशी माहिती संशोधक पा सुरेश चोपणे ह्यांनी दिली.


प्रा सुरेश चोपणे हे २०१९ ते २०२४ पर्यंत प्लेईस्टोन काळातील गाळात जीवाश्मे शोधत होते.त्यांना २०२०-२१ मध्ये प्रथमता चंद्रपूर तालुक्यात वर्धा आणि पैनगंगा नदी नदी पात्रात संगमाजवळ जीवाश्मे मिळाली .संपूर्ण कोरोना काळात चंद्रपूर तालुक्यातील वर्धा नदीवर सर्वेक्षण सुरु असतानाच २०२१-२२ मध्ये वरोरा तालुक्यातील वर्धा नदीपात्रात भागात विशाल काय येलीफास नामाडिकस सदृश्य हत्तींची जीवाश्मे आढळली .त्यांचे वर्धा नदीवरील संशोधन हे २०२४-२५ मध्ये पूर्ण झाले असून ही सर्व जीवाश्मे त्यांनि घरी स्थापन केलेल्या ,सुरेश चोपणे रॉक म्युझियम मध्ये संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी त्यांच्या संग्रहालयात ठेवली आहेत.भूगोल,भूशास्त्र ,जीवशास्त्र आणि विज्ञान शाखेच्या संशोधक विध्यार्त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. Lost elephant species India


मिळालेली जीवाश्मे – सापडलेल्या जीवाश्म अवशेषात हत्तीच्या मांडीची हाडे ,चर्वण करणारी दात (Molar) आणि डोक्याची कवटी ,छातीची हाडे अश्या अवयवांचा समावेश आहे.अजून हत्तीची दोन लांब सुळे दात मिळाली नसली तरी एक तुकडा मात्र मिळाला आहे. .गेल्या दोन-तीन दशकापासून ही जीवाश्मे नदीच्या पुरामुळे वाहून गेलेली असल्याने महत्वाचे पुरावे नष्ट झाली आहेत.परंतु अजूनही काही ठिकाणी सजीवांची जीवाश्मे जमिनीत दडलेली आहेत . सविस्तर उत्खननात ती बाहेर येवू शकतात. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग,पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तसेच तेलंगाना मध्ये हत्त्तीची आशियायी हत्तींची जीवाश्मे मिळाली आहेत परंतु स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्मे मिळण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. Lost elephant species India

Extinct elephant fossils Maharashtra


पाषाण युगीन मानवाची अवजारे आढळली – ह्या संशोधनाचा महत्वाचा घटक म्हणजे ह्याच हत्तींच्या जीवाश्मा सोबत पाषाणयुगीन मानवानी बनविलेले दगडी अवजावरे सापडली आहेत. एकाच ठिकाणी हत्तींची जीवाश्मे आणि पाषाण युगीन अवजारे सापडन्यामुळे मानव हत्तींची शिकार करीत होते हे सिध्द होते तर मानवाच्या अति शिकारीमुळे आणि देखील हत्त्ती विलुप्त होण्यास मदत झाली असावी असे लक्षात येते. येथे मिळालेल्या अवजारात हात कुऱ्हाडी (हँन्ड एक्स), आणि इतर प्रकारची अवजारे प्रा सुरेश चोपणे ह्यांना आढळली असून ती प्रा सुरेश चोपणे त्यांच्या संग्रहालयात ठेवलेली आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!