tiger captured in Maharashtra
tiger captured in Maharashtra : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात नागरिकांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघाला १७ एप्रिल रोजी डार्ट मारीत जेरबंद करण्यात आले. problematic tiger captured
चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला असून आतापर्यंत या संघर्षात १२ नागरिकांचा बळी गेला आहे. उत्तर ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रात T-३ वाघाने ४ नागरिकांवर हल्ला करीत दोघांना ठार तर दोघांना जखमी केले होते. या भागात मानव वन्य जीव संघर्ष वाढू नये यासाठी नरभक्षक वाघाला पकडणे गरजेचे असल्याने वनविभागाने वाघ पकडण्यासाठीची मोहीम राबविली. brahmapuri tiger attack
चंद्रपुरातील नदीत दडलं रहस्य, नदीतून उलगडलं २५ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास
१७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी उपक्षेत्र मेंडकी नियतक्षेत्र चिचखेडा मधील कक्ष क्रमांक १५२ मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यानो डार्ट तयार करून दिला, त्यानंतर शुटर पोलीस कर्मचारी अजय मराठे यांनी T-३ वाघाला डार्ट मारीत बेशुद्ध करीत जेरबंद केले.
सदर मोहीम सहायक वनसंरक्षक ब्रह्मपुरी वनविभाग महेश चोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नरड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर पोलीस कर्मचारी अजय मराठे, विकास ताजने, योगेश लडके, प्रफुल वाटगुरे, गूणनक धोरे, दीपेश टेम्भूर्णे, वसीम शेख, अमोल कोरपे, जय सहारे, अक्षय दांडेकर, अभिषेक चांदेकर व राकेश आहुजा यांच्या उपस्थितीत पार पडली.
जेरबंद करण्यात आलेल्या वाघाचे वय १३ वर्ष असून त्याला गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूरमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे.